Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 27 October To 2 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 27 October To 2 November 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपून नोव्हेंबर महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल होणार आहे. तसेच, सूर्य आणि बुध ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीसाठी नवीन आठवड्यात अनेक आव्हानं समोर येतील. त्याचा तुम्ही प्रामाणिकपणे सामना करावा. आठवड्याच्या शेवटी सर्व गोष्टी सुरळीत होतील.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. तसेच, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. बिझनेसच्या संदर्भात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
आरोग्य (Health) - सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच, मानसिक शांतीसाठी तुम्हाला योग, व्यायाम करण्याची गरज आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांनी रिलेशनशिपमध्ये सावधानतेने वागण्याची गरज आहे. पार्टनरवर जास्त हक्क गाजवू नका. तसेच, कंट्रोलिंग स्वभाव बाजूला ठेवा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा.
करिअर (Career) - कन्या राशीच्या लोकांनी करिअरच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या व्यवसायावर देखील तुम्ही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, या आठवड्यात तुम्हाला एमर्जन्सीमुळे काही पैसे खर्च करावे लागू शकतात. यासाठी पैशांचा जपून वापर करा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचा निष्काळजीपणा करु नका. तसेच, मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात जा. त्यांच्या क्रिएटीव्हीला चांगला वाव मिळेल. कोमट पाण्याचं सेवन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















