एक्स्प्लोर

Weekly Horoscope 27 March to 2 April 2023 : हा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 27 March to 2 April 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 27 March to 2 April 2023 : मार्च महिन्यातील हा शेवटचा आठवडा मेष, सिंह आणि कन्या राशीसाठी करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तर, वृषभ, मिथुन राशीच्या खर्चात वाढ होणार आहे. हा आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने खास आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष 

मेष राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगला पैसा मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाशी काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा कराल, ज्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होईल. आठवड्याच्या मध्यात प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या पाठिंब्याने तुम्ही मालमत्तेच्या कामात अडकू शकता. नोकरीची स्थिती चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुटुंबाकडे लक्ष द्या आणि घरातील लोकांशी प्रेमाने वागा. आरोग्य चांगले राहील परंतु निष्काळजीपणा टाळा.

वृषभ 

वृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती जीवनात आनंदी वातावरण असेल. काही कारणामुळे तुमचे पैसे खूप खर्च होऊ शकतात. याचाच ताण तुमच्या कामावर येऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात प्रवासाला जाता येईल. प्रत्येक कामात तुम्हाला मित्रांकडून मदत मिळेल आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला खर्चाचा सामना करावा लागेल. काही महत्त्वाच्या कामात कुटुंबाचा पैसा खर्च होताना दिसेल. तब्येतीत चढ-उतार असतील. सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात तणावापासून मुक्ती मिळण्याची परिस्थिती राहील. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यवसायात सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्य चांगले राहील आणि नोकरीत थोडा तणाव राहील.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्रेम जीवनात आनंद मिळेल. यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. विवाहित लोकांना मुलांकडून चांगली माहिती मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. चांगल्या उत्पन्नामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण कराल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. तब्येत बिघडू शकते. सौम्य ताप येऊ शकतो. आठवड्याचे शेवटचे दिवस घरगुती जीवनासाठी चांगले असतील. कुटुंबासोबत आनंद साजरा कराल.

सिंह 

सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यासोबतच कुटुंबालाही भरपूर वेळ द्या. तुमचे संतुलन चांगले राहील ज्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी आनंदी राहाल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या बॉसकडून एखादे मोठे काम मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठेचा फायदा होईल. उत्पन्न चांगले राहील. काही छोटे-मोठे खर्चही होतील. लव्ह लाईफसाठी वेळ चांगला आहे पण बोलण्यात गोडवा ठेवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्च वाढतील. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. नशीब बलवत्तर असेल तर सर्व कामे होतील. पैशांची कमतरता भासणार नाही आणि उत्पन्न वाढेल. भावांसोबतची भावना अधिक दृढ होईल. सप्ताहाच्या मध्यात करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या कामात मोठे पद मिळू शकते. कौटुंबिक तणावात सामंजस्य राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील आणि तुमच्या गरजांसोबतच तुमच्या काही महत्त्वाच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. लव्ह लाईफसाठीही वेळ चांगला राहील आणि वैवाहिक जीवनातही आनंद राहील.

तूळ 

तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक संघर्षात अडकलेले दिसतील. तब्येतीत चढ-उतार असतील. सर्दी किंवा तापाची समस्या भासू शकते. आठवड्याच्या मध्यात लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवासही होऊ शकतो. तुम्ही कामातून एक किंवा दोन दिवस सुट्टी घेऊ शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घर आणि काम या दोन्ही ठिकाणी चांगले संतुलन दिसून येईल. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरचीही साथ मिळेल आणि ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. या आठवड्यात ऑफिसमध्ये जो तुमच्याशी सर्वात प्रेमाने बोलतो त्याच्याशी सावधगिरी बाळगा.

वृश्चिक 

वृश्चिक राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला नवीन व्यावसायिक करार करतील. यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात खूप फायदा होईल. लाइफ पार्टनरसोबत रोमान्स वाढेल. आठवड्याच्या मध्यात गुंतवणूक करणे नुकसानकारक ठरू शकते. काही मोठ्या खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले जातील. एखाद्या सुंदर ठिकाणी सुट्टी घालवण्याची योजना आखू शकता. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची आणि दिनचर्येची खूप काळजी घ्या. 

धनु 

आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीचे लोक काहीसे अस्वस्थ दिसू शकतात. काही कामात अडथळे येतील ज्यामुळे तुम्ही नाराज असाल. मानसिक तणावही वाढेल. खर्चही जास्त असतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. बिझनेस चांगला राहील पण बिझनेस पार्टनरशी भांडण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर वाटेल. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला या समस्येतून बाहेर काढेल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर 

आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या लाभाच्या लालसेपोटी दूरचे नुकसान टाळावे. कामाची जागा असो की घर, चूक झाली असेल तर एखादी सबब सांगण्याऐवजी किंवा खोटे बोलण्याऐवजी ती स्वीकारणे योग्य ठरेल, अन्यथा ती गोष्ट उघड झाल्यावर तुम्हाला आणखी लाजिरवाणे व्हावे लागेल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर तो न्यायालयात नेण्याऐवजी वाटाघाटीने सोडवणे योग्य ठरेल. व्यावसायिकाने गोंधळात व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी संबंधित बिझी शेड्युलमधून कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. आजारांपासून सावध राहा.

कुंभ 

आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय वाढवण्याचे नियोजन यशस्वी होताना दिसेल. विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला प्रभावशाली व्यक्तीसह कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नशीब तुम्हाला साथ देईल, आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणी सोडवता येतील. राजकीय व्यक्तीला या काळात मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी करिअर मोठं यश मिळेल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. कुटुंबात सुसंवाद राहील. प्रेमप्रकरणासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जर तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचे लग्नात रुपांतर करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमचे नशीब चांगले असेल. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश आणि नफा मिळेल. तुम्ही तुमच्या नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कोणत्याही कंपनीकडून ऑफर लेटर मिळू शकते. व्यावसायिकाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जर तुम्ही पूर्वी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्यातून मोठा नफा मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुमचा बराचसा वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात जाईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याCabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Embed widget