Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसा, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना आपण गणरायासाठी समर्पित करतो. तसेच, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सुखाचा तसेच, वाईटाचा देखील अनुभव येऊ शकतो. त्यामुळे तुमचं मन अशांत राहील. या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात लाडक्या बाप्पाचं देखील आगमन होणार आहे. त्यामुळे या राशीवर बाप्पाची कृपा असणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळदेखील मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयास तुमचा चांगला राहील.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या आळसाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तसेच, तुम्ही जी कामे नियोजित केली आहेत. ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी शिका, तसेच, मनात सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी सतत वाचन करा. ध्यान करा.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा काहीसा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तितकाच आव्हानात्मक देखील आहे. त्यामुळे या कालावधीत तुमची कर्म प्रामाणिकपणे करत राहा. कोणाच्याही अध्यात मध्यात पडू नका. तसेच, या काळात सामाजिक कार्यात देखील तुम्ही सहभागी व्हाल. मानसिक शांतीसाठी नियमित योग, ध्यान करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला अनेक शुभवार्ता ऐकायला मिळतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विकास झालेला दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक गोष्टींची जाणीव होईल. तसेच, पैशांचा खर्चदेखील वाढेल. त्यामुळे पैसा जपून खर्च करा. मुलांना शिकणासाठी प्रोत्साहन करा. स्वत:तील कलागुण जपण्याचा प्रयत्न करा. तसेच, कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा दाखवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















