Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशीवर होणार परिणाम? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या नात्यात सामंजस्य असणं गरजेचं आहे. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. नात्यात संवाद असणं महत्त्वाचं आहे.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, ऑफिसमध्ये कामाचा जरा वाढता ताण असेल. अशा वेळी जास्त मानसिक ताण घेऊ नका. ध्यान करा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमच्या हातात पैसा येणारसुद्धा आणि पैसा हातातून जाणारसुद्धा. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. मात्र, विनाकारण पैसेही खर्च करु नका. अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोड्याफार तक्रारी जाणवू शकतात. अशा वेळी योग्य वेळी योग्य आहार आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. मानसिक ताण घेऊ नका.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
कौटुंबिक जीवन (Family) - पार्टनरच्या प्रती कोणतीच तक्रार मनात ठेवू नका. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या पार्टनरबरोबर बोलूनच व्यक्त करा. जे लोक सिंगल आहेत ते मिंगल होण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्याच कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या कामात तुमची ढवळाढवळ करु नका. तसेच, वरिष्ठांचं बोलणं मनावर घेऊ नका. मात्र, त्यांनी दिलेला कामाचा सल्ला तुमच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुम्ही फार भाग्यशाली असाल. देवी लक्ष्मीच्या कृपेने विविध मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे.
आरोग्य (Health) - तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळ्या ठेवा. तुमच्या दिनश्चर्येत बदल करा. तसेच, सकारात्मक वाटण्यासाठी रोज पहाटे उठून चालण्याची सवय लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















