Weekly Horoscope 24 April to 30 April 2023 : एप्रिल महिन्यातील शेवटचा आठवडा 'या' राशींसाठी आव्हानात्मक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 April to 30 April 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 24 April to 30 April 2023 : एप्रिल महिन्यातील हा शेवटचा आठवडा आहे. मेष, मिथुन, वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात कमजोर राहील. कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरीच्या नवीन संधी घेऊन येईल. सर्व 12 राशींचा हा संपूर्ण आठवडा कसा असेल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
मेष राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला घरात काही कार्यक्रम आयोजित करतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय राहील. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव होईल आणि प्रत्येकजण खूप आनंदात दिसेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी कुठेतरी जाऊ शकता. लहान प्रवासाचे योग येतील. रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता विक्री खरेदीतून लाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबाला वेळ द्या. नोकरीत तुमची बाजू चांगली राहील. सर्वजण तुमच्या कामाचं कौतुक करतील.
वृषभ
वृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला खूप आनंदी राहतील. तुमचा आत्मविश्वास भरपूर असेल. तुम्ही तुमच्यासाठी नवीन कपडे, गॅजेट्स आणि कॉस्मेटिक वस्तू खरेदी कराल. वैयक्तिक जीवनावर अधिक भर द्या. कौटुंबिक जीवनातही आनंदाचं वातावरण असेल. तुमच्यातील केमिस्ट्री छान असेल. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक तणाव असू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत छोट्या प्रवासातून फायदा होईल. व्यवसायात सुधारणा दिसून येईल. नोकरीत सहकाऱ्याची साथ मिळेल.
मिथुन
मिथुन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला प्रचंड खर्च करू शकतात. घरासाठी एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन किंवा अशी कोणतीही सोयीची वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. या आठवड्यात तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात धन प्राप्तीची स्थिती राहील. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराच्या सहकार्यासोबतच काही आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याची योजना करू शकता. तब्येत ठीक राहील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत चांगले परिणाम दिसतील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही आधी काही काम केले असेल, त्यासाठी तुम्हाला या वेळेत पैसे मिळू शकतात आणि कोणत्याही नवीन कामासाठी तुम्हाला अधिक पैसे मिळू शकतात. तुमच्या प्रेम जीवनाच आनंद राहील. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा. विवाहित लोकांना घरगुती जीवनात आनंद मिळेल आणि ते आपल्या मुलांबरोबर प्रेमाने खेळतील. नोकरीत स्थिती मजबूत राहील. आठवड्याच्या मध्यात काही खर्च होतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहीजण भावूक होतील आणि आपल्या लोकांची चिंता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या. व्यवसाय चांगला राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना चांगल्या उत्पन्नामुळे आठवड्याच्या सुरुवातीला त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. प्रेम जीवनासाठी वेळ चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात काही खर्च होतील. तुम्ही थोडे मानसिक तणावात असाल, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत परिस्थिती पूर्णपणे उलट होईल. तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. घरगुती जीवनात प्रेम राहील. नोकरीत तुमचे पद वाढू शकते.
कन्या
कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत आपले वर्चस्व राखतील. तुमचे मन कामात व्यस्त राहील, विचारशक्ती मजबूत राहील. उत्पन्न चांगले राहील. आठवड्याच्या मध्यात उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होण्याची आणखी काही चिन्हे दिसतील. उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत मिळू शकतात. प्रेम जीवनात आनंद राहील. आठवड्याच्या मध्यात अविवाहितांसाठी शुभवार्ता ऐकायला मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्च वाढतील. तब्येत बिघडू शकते.
तूळ
तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला लांबचा प्रवास करू शकतात. लांबच्या प्रवासामुळे व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत बदलीची परिस्थिती निर्माण होणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आठवड्याच्या मध्यात घरावर लक्ष केंद्रित करा. नोकरीतही स्वत:ला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमची काही नवीन लोकांशी मैत्री होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रेम जीवनामध्ये सुधारणा होईल आणि तुम्हाला कौटुंबिक जीवनातही चांगले परिणाम मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला काहीसे चिंतेत राहतील. तुमची तब्येत बिघडू शकते. कोणतीही दुखापत होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सासरच्या घरात वाद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीत आत्मविश्वास राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात सुधारणा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमचे लक्ष खूप वाढेल. घरातील कुटुंबाची चांगली काळजी घ्याल.
धनु
धनु राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती जीवनाचा पूर्ण आनंद घेतील. जोडीदाराकडून आर्थिक लाभाची बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायासाठी चांगला काळ जाईल. व्यावसायिक भागीदारीतही लाभाची स्थिती राहील. आठवड्याच्या मध्यात आरोग्य बिघडू शकते. मन शांत राहील. पैशांची कमतरता भासू शकते. केवळ सावधगिरी बाळगून आपण समस्या टाळण्यास सक्षम असाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नशीब तुमच्या सोबत असेल. अचानक काही योजना पूर्ण होतील, ज्यामुळे धन प्राप्ती होईल. करिअरसाठी काळ चढ-उतारांनी भरलेला असेल.
मकर
मकर राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला खूप आनंदी दिसतील. प्रेम जीवनासाठी वेळ चांगला राहील आणि तुमची केमिस्ट्रीही चांगली राहील. आठवड्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत खर्चात वाढ होईल. मुलांना सुट्टीत बाहेर फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी नीट संवाद साधा. नोकरीत मजबूत स्थिती असेल. आठवड्याच्या मध्यात घरगुती जीवनात आनंदाचे वातावरण असेल, परंतु कौटुंबिक तणावाचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होईल , ते टाळण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आरोग्य बिघडू शकते आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
कुंभ
कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक कार्यात गुंतलेले दिसतील. घराच्या आनंदासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. घरात आनंदाचे वातावरण राहील. परस्पर प्रेम, स्नेह वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. तुमची कोणतीही योजना यशस्वी होईल. नोकरीत बदलाची परिस्थिती राहील. प्रेम जीवन आनंदाने जाईल. आठवड्याचे शेवटचे दिवस कमजोर असतील. या दरम्यान तुमची तब्येत बिघडू शकते. मानसिक ताणतणाव वाढेल, मनाला भान राहणार नाही, पण नोकरीत स्वतःला गुंतवून ठेवाल, व्यवसायात पैसे खर्च होतील.
मीन
मीन राशीचे लोकांचा आठवड्याच्या सुरुवातीला मित्रांबरोबर चांगला वेळ जाईल. तुम्ही मित्रांबरोबर एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. भावा-बहिणींसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. आठवड्याच्या मध्यात घर किंवा जमीन खरेदी करू शकता. तुम्ही घरी जास्त वेळ घालवा, पण नोकरीतही तितकेच लक्ष द्याल. व्यवसायासाठी नवीन गुंतवणूक करू शकता. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला प्रेम जीवनासाठी चांगला वेळ मिळेल. एकमेकांना समजून घ्या. एकमेकांच्या गरजा पूर्ण होतील, उत्पन्नही वाढेल आणि व्यवसाय जोरात सुरु होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :