एक्स्प्लोर

Horoscope Today 24 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 24 April 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 April 2023 : आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तर, कन्या, मकर राशीसाठी आजचा दिवस तितका लाभदायक नसणार आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शोधात भटकणाऱ्यांना आज चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे रखडलेले कामही पूर्ण होईल. तुमची आर्थिक समस्या दूर होईल. आजचा दिवस शुभ असल्या कारणाने सकारात्मक विचार करा. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. आज तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. लोकांच्या नात्याबद्दल बोलता येईल. आईचा सहवास मिळेल. तुम्ही तुमच्या मनातील समस्या तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत तुमची बदली होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत शेजारच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुमच्या विचारांवर खोलवर परिणाम होईल. आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक गोष्टीवर प्रेम दाखवणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. पैसा, प्रेम, कुटुंब यांपासून दूर राहून, आज तुम्ही आनंदाच्या शोधात आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात सर्व काही चांगले वाटेल. तुमच्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला फार आनंदी होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराच्या नोकरीतील प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल. तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी बसून काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकता. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट तपासा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धती अवलंबतील. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना आज खूप फायदा होईल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्ही कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा आणि संपत्तीचे जतन कसे करायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. लोकांशी स्पष्टपणे बोलण्याची आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची भीती तुमच्या अस्वस्थतेचे कारण बनू शकते, ही समस्या टाळण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवा. काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील आणि त्यातून नवीन आर्थिक नफा मिळेल. कल्पनांच्या मागे धावू नका आणि वास्तववादी व्हा. तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवा कारण ते तुमच्यासाठी खूप चांगले असेल. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक तुम्हाला भरीव नफा देईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढून तुमचे आवडते काम करा, यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करा. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम जीवन तुमचे आनंदाने भरलेले असेल. आज प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी खूप चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांसह, तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी मेजवानीसाठी जाण्याचा बेत आहे, जिथे सर्वजण खूप मजा करताना दिसतील. आज शेजारच्या वादात पडणे टाळा, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे जे काम थांबले होते ते आज पूर्ण होईल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल. आज तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या तब्येतीवर खूप पैसे खर्च करावे लागतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल पण त्याच वेळी नाते आणखी घट्ट होईल. अशा कामांमध्ये सहभागी होण्यासाठी ही चांगली वेळ आहे ज्यात तरुणांचा सहभाग असतो. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत होता, त्यात तुम्हाला यश मिळेल. इतरांना आनंद वाटून तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील. आज तुमचा मोकळा वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात वाया जाऊ शकतो. जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर घालवू शकता. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. ज्यांना व्यवसाय पुढे नेण्यात अडचणी येत आहेत, त्यांना विशेष व्यक्तीची मदत मिळेल. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील. तुमच्या काही वाईट सवयीमुळे तुमचे पालक तुमच्यावर नाराज असतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. बदलत्या हवामानामुळे मुलांच्या तब्येतीत चढ-उतार होतील. जे गेल्या काही दिवसांपासून खूप व्यस्त आहेत, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. प्रत्येकजण खूप आनंदी दिसेल. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात होते, त्यांना मित्रांच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी वर्तनामुळे घरातील वातावरण हलकेफुलके आणि आनंददायी होईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते आपला व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. छोट्या व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळेल. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता बिघडेल. प्रियकर एकमेकांच्या कौटुंबिक भावना समजून घेतील. पैसा, प्रेम आणि कुटुंबापासून दूर राहून, आज तुम्ही आनंदाच्या शोधात असाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा.

कुंभ

आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डील मिळू शकते. आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाची कामे मध्येच अडकू शकतात. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, संध्याकाळी कुटुंबासह छान ठिकाणी जा. दिवस चांगला कसा बनवायचा, यासाठी तुम्हाला स्वतःसाठीही वेळ काढायला शिकले पाहिजे. जोडीदाराकडून आलेल्या तणावामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होईल. आज तुम्हाला तुमचा प्रियकर तुमच्यापासून दूर जातोय असं वाटेल, अशा वेळी एकत्र बसून एकमेकांचे मन समजून घ्या, तुम्ही भेट सुद्धा घेऊ शकता. जे नोकरी करत आहेत, त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. वरिष्ठही तुमच्या कामाचे कौतुक करतील. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. मुलाचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही मुलांसोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. तुमचा उदार स्वभाव आज तुमच्यासाठी अनेक आनंदाचे क्षण घेऊन येईल. झटपट पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. मुले तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतील. आज तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करून तुम्हाला स्वतःसाठी नक्कीच वेळ मिळेल, पण या वेळेचा तुम्ही स्वतःच्या आवडीनुसार वापर करू शकणार नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 April 2023 : मेष, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026: दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...
दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...
Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
Diwali Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
Embed widget