(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 21 August to 27 August 2023 : आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 21 August to 27 August 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 21 August to 27 August 2023 : ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या आठवड्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेक राशीच्या लोकांसाठी खास आहे. तर, काही राशीच्या लोकांसाठी संघर्षाचा असणार आहे. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात काही चांगले विचार तुमच्या मनात येतील. ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते, ज्यामुळे तुम्हाला थोडा मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सुद्धा ताण जाणवेल. या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य लाभ मिळेल. तुम्हाला भरपूर यश मिळू शकेल. कुटुंबाचाही पाठिंबा तुम्हाला मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगल्या संधी घेऊन येणारा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. व्यवसायात तुम्हाला प्रगती जाणवेल. तुमची आर्थिक बाजूही चांगली असणार आहे. नोकरदार वर्गाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिक राहा. तुमची सर्व आव्हाने दूर होतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्रयत्न करा.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा उत्सुकतेचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या आठवड्यात तुम्हाला जवळच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही संधी खूप चांगली आहे. आठवड्याच्या मध्यानंतर बेरोजगारांना चांगली नोकरीची संधी मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही काही काळ विश्रांती घेणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. नवीन ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांचा सहवास लाभेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. पैशांची गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. फक्त योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रत्येक काम पूर्ण करू शकाल. याशिवाय कोणताही दिर्घकालीन आजार असेल तर तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी नीट विचार करा. या आठवड्यात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकाने योग्यरित्या नियोजित पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवेल. कुटुंबीयांबरोबर आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळाला भेट द्या.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील. तुम्ही तुमच्या कामात खूप प्रगती कराल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यात तुमचे आर्थिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता. तसेच, नवीन वाहन खरेदी करण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर ही चांगली संधी आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. आर्थिक स्थिती चांगली असल्याने पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करू शकता. आरोग्याबाबत सतर्क असणं गरजेचं आहे. मानसिक तणावही जाणवेल. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ सदस्यांचा विचार लक्षात घेऊन निर्णय घ्या.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमच्या पालकांचा किंवा मोठ्या भावंडांचा अतिरेक हस्तक्षेप तुम्हाला तणाव देऊ शकतो. तुम्हाला काही गोष्टींमध्ये खूप मेहनत करावी लागेल. या राशीचे जे विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना या आठवड्याच्या मध्यात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरदार वर्गाला लवकरच नवीन नोकरीची संधी मिळेल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला विशेष फायदा होताना दिसणार नाही. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. या आठवड्यात मित्राच्या साहाय्याने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक आहे. परदेशात जाण्याचाही बेत आखू शकता. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही चांगले करायचे असेल तर तुमच्यासाठी वेळ खूप चांगला आहे. वैवाहिक जीवनासाठी हा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मंदिरात तसेच धार्मिक स्थळांना भेट द्यावीशी वाटेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीत काही अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांत असेल, परंतु तुम्ही समजूतदारपणा दाखवाल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला जाणार आहे. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती दिसून येईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. शारीरिकदृष्ट्या कोणताही त्रास, वेदना जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवासात तुमचे पैसे खर्च करू शकता. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. प्रेम संबंध सामान्य राहतील. आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :