एक्स्प्लोर

Horoscope Today 19 August 2023 : मेष, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 19 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 August 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांची आज खास व्यक्तीशी भेट होईल. तर, सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे आरोग्य खूप चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. आज तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. कामाच्या माध्यमातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.  मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. आज तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. म्हणूनच तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आज कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना काळजी घ्या. दूरचा प्रवास करू नका, अन्यथा तुम्हाला काही शारीरिक दुखापत होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती खूपच तंगीची असेल. पैशांशिवाय तुमची अनेक कामे रखडू शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असू शकतो. आज व्यवसायात कोणतेही मोठे व्यवहार करू नका, अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल आणि मुलाच्या करिअरच्या बाजूने तुमचे मन खूप आनंदी असेल. तुमच्या मुलांच्या लग्नाशी संबंधित कोणताही प्रस्ताव आज येऊ शकतो. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील. आज कोणत्याही प्रकारचा लांबचा प्रवास करू नका. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा सावधगिरीचा असेल. तुमच्या व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करू नका. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.  तुमची प्रकृती पूर्णपणे तंदुरुस्त राहील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित करू शकता. तुमचे कुटुंबीय तुमच्यावर खूप आनंदी असतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह बाहेर फिरण्याची योजना आखू शकता. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप शुभ राहील. तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल करायचे असतील तर ते करता येतील. यामुळे तुम्हाला फायदा होईल.  कौटुंबिक मतभेद जास्त काळ राहू देऊ नका, अन्यथा कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल आतून खूप आनंदी असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. या प्रवासामुळे तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल आणि तुम्हाला मनःशांती देखील मिळेल. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्ही खूप काळजी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. तुम्हाला पैशाशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचे मन खूप अस्वस्थ असेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहात त्यात कोणतेही नवीन बदल करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही कोणत्याही कामाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात काही समस्या आहेत, परंतु त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही संयम राखून बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा चांगला आहे. व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची तुम्ही खूप काळजी करू शकता. उद्या तुमचे मन मुलांबद्दल थोडेसे चिंतेत असेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचाचा दिवस थोडा त्रासदायक असेल.  तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. तुमचे काम पूर्ण होईल. जर तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल, तर त्यासाठी ही वेळ योग्य नाही. तुम्हाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमची प्रकृती चांगली राहील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते, आणि भागीदारीत तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. घरातील लहान व्यक्तीच्या लग्नासाठी नवीन प्रस्ताव येऊ शकतात. निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करू नका. अन्यथा, भविष्यात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. राजकारणात चांगली संधी आहे. सामाजिक क्षेत्रात नवीन लोक भेटू शकतात.  तुम्हाला तुमच्या सर्व नातेवाइकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना करू शकता आणि ही योजना तुमच्यासाठी खूप यशस्वी होईल. तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पावर मोठा निर्णय घेऊ शकता. या निर्णयात तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठीशी उभे राहतील. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या तब्येतीत जास्त थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण देखील येऊ शकतो. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर  तुमचे विरोधक तुमच्यासमोर उभे राहतील. त्यामुळे जपून निर्णय घ्या. आज व्यावसायिकांनी थोडे सावध राहावे. आज तुम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमचे मनही खूप अस्वस्थ होईल. आरोग्याबाबत काळजी वाटू शकते.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा मानसिक तणावाचा राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल, ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सावधगिरीचा असेल. तुमचा व्यवसाय बुडाल्यास तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल.  जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. मुलाच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता. तुम्हाला तुमच्या भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुमचे मन धार्मिक कार्याकडे वळेल. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता. आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायात नवीन बदल करू शकतात. तुम्हाला याचा लाभ मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 18 August 2023 : मेष, मिथुन सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींच्या लोकांनी बचत करा! नवा आठवडा आर्थिक नियोजन करा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींच्या लोकांनी बचत करा! नवा आठवडा आर्थिक नियोजन करा, साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 19 October 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्यात यू-टर्न आणणारा; 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्यात यू-टर्न आणणारा; 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची नववी माळ! देवी सिद्धिदात्रीच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त जाणून घ्या
आज नवरात्रीची नववी माळ! देवी सिद्धिदात्रीच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त जाणून घ्या

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Election 2026 Results: गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
Horoscope Today 19 October 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Maharashtra Live blog updates: गोकुळच्या निवडणुकीला आज निकाल, कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
Amravati Crime: चक्क डॉक्टरकडून साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अमरावतीत डॉक्टरकडून चक्क साडेतीन लाखांमध्ये नवजात बाळाची विक्री; शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, डॉक्टर महिलेसह पती अन् प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
ABP Majha Top 10, 19 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 19 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget