Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 To 23 February 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 February 2025 : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या महिन्याच अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. फेब्रुवारीचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळवून द्यावा लागेल. तसेच, तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर इतरांचं जास्त लक्ष असेल. त्यामुळे कसलीच काटकसर सोडू नका. प्रामाणिकपणे काम करत राहा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ना फायदा ना तोट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र, मुलांच्या शालेय जीवनाबद्दल तुम्हाला सतत चिंता सतावत राहील. या आठवड्यात अनेक लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलताना थोडं सतर्क राहण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही ठरवलेली कामे योग्य नियोजन पद्धतीने पार पडतील. मात्र, आठवडा जसजसा सरत जाईल तसतशा तुमच्या अडचणींत वाढ होत जाईल. अनेक नवीन कामांचा ताण तुमच्यावर पडेल. त्यामुळे तुम्ही फार निराश व्हाल. मात्र काळजी करण्याची गरज नाही. ही वेळही निघून जाईल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.तसेच, आठवण्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, खोकल्याचा त्रास जाणवेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या अडचणीत सापडू शकता. त्यामुळेच कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या वैवाहिक जीवनात काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळेल. मात्र, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. या आठवड्यात तुम्ही फार मेहनत घेणं गरजेचं आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तरुणांना चांगला रोजगार मिळेल. तसेच, भगवान शंकराची तुमच्यावर कृपा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















