Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा! तुमच्यासाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 September 2025: सप्टेंबरचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचा तिसरा आठवडा 15 ते 21 सप्टेंबर लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच, हा आठवड्यात पितृपक्ष असणार आहे. तसेच, या आठवड्यात सू्र्यग्रहणही होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा चांगला असणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल, नोकरदारांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. नोकरीत तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. हा आठवडा व्यापारी वर्गासाठीही चांगला आहे. तुम्हाला जोडीदाराशी भांडणे टाळावी लागतील. वैवाहिक जीवनात काही संघर्ष होऊ शकतो. या आठवड्यात प्रेम जीवन खूप चांगले राहील. आरोग्य मजबूत असेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला राहणार आहे. आरोग्य कमकुवत असेल आणि बदलत्या हवामानात तुम्ही आजारी पडू शकता. काळजी घ्या. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. तुम्ही भविष्यातील सहलीची योजना कराल आणि रोमँटिक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवन चांगले राहील. कौटुंबिक जीवनातून समाधान मिळेल
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा खूप चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने राहाल. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रेम जीवन जगणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. विवाहित जीवन जगणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील आणि जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि आपुलकी पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. खर्च वाढेल, कारण घरगुती खर्च वाढतील. उत्पन्न सामान्य राहील. तुम्ही सहलीला जाण्याचा विचार कराल, परंतु सध्या सहलीला जाण्यासाठी वेळ अनुकूल नाही. विवाहित जीवन आनंदी राहील
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा थोडा नाजूक राहणार आहे. खर्च वाढतील, ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल. उत्पन्न ठीक राहील, तरीही काही अचानक खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. विवाहित जीवन सामान्य राहील. प्रेम जीवनात काही नवीन समस्या उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील सदस्य तुमच्या कामात मदत करतील
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा आठवडा खूप चांगला राहणार आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि प्रणय वाढेल. नोकरी- कामाच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक वर्गालाही भरपूर नफा मिळेल. सहलीला जाण्याची शक्यता असली तरी प्रवास करणे फायदेशीर ठरणार नाही.
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा तिसरा आठवडा कसा जाणार? पितृपक्षाचा काळ कोणासाठी लकी? कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















