एक्स्प्लोर

Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 15-21 April 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15-21 April 2024 : एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. तूळ आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा (Weekly Horoscope 15 To 21 April 2024) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सर्व कामांत यश मिळेल. तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल, आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मित्रांच्या सहकार्याने तुमच्या व्यवसायातील समस्या सुटतील. या आठवड्यात घरात तुमच्या लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरात काही नवीन गोष्टी घडतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही जोडीदारासोबत व्यस्त असाल. तुम्ही जोडीदाराला जास्त वेळ द्याल. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांच्या नात्यात बाहेरच्या लोकांमुळे तणाव वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल, यामुळे तुमचं मन आनंदी होईल. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामांत कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत काही विषयांवर चर्चा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत खालावली असल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाईल. तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल आणि चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात पैशाची आवक कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, पण कुणाशीही जास्त बोलू नका.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमची तब्येत या काळात बिघडू शकते. काही कामाबाबत मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात सर्व परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली राहील, मन प्रसन्न होईल. तुम्ही या आठवड्यात खूप रोमँटिक असाल. वैवाहिक जीवनात रोमान्स राहील, जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगतीसाठी वेळ उत्तम राहील. व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक लाभ होईल, बँक बॅलन्स वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला बॉसच्या पुढे-मागे करण्यात, त्याला खुश ठेवण्यात व्यस्त राहतील.  या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय चांगला चालेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल आणि विवाहितांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. आरोग्य बिघडेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. आरोग्य नाजूक राहील, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या देखील भेडसावतील. व्यवसायात निराशा येऊ शकते. लव्ह लाईफमध्ये अडचणी येतील.

मीन रास (Pisces)

मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक राहतील. नोकरी-व्यवसायात तुम्ही प्रगती कराल. तुम्ही कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल, कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्याल. आठवड्याच्या मध्यात पैशाची आवक वाढेल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही रोमँटिक राहाल. तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल. तुमच्यामधीस काही खास गोष्टी तुमच्या बॉसला प्रभावित करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ; विविध स्रोतांतून होणार धनप्राप्ती, नांदणार सुख-समृद्धी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget