एक्स्प्लोर

Weekly Horoscope 14 August to 20 August 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 14 August to 20 August 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 14 August to 20 August 2023 : ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा आठवडा मेष, मिथुन, वृश्चिक राशींसाठी चांगला जाणर आहे. तर, कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीसाठी नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमचा आठवडा तुमच्या कुटुंबीयांबरोबर घालवाल. आरोग्याची चांगली काळजी घ्या. वैवाहिक जीवन चांगले जाईल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होईल. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, स्वतःची काळजी घ्या. नोकरीत तुमची बाजू चांगली राहील. सर्वजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमचे आरोग्य खूप चांगले राहील. वृषभ राशीचे लोक या आठवड्यात जे काही काम करतील, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे करू शकाल. वृषभ राशीचे लोक जे व्यवसाय करतात त्यांना या आठवड्यात मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये कोणतीही मोठी कामगिरी करू शकता. तुम्ही जी काही योजना कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे काम व्यस्त राहील आणि उत्पन्नातही सुधारणा होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता. वैवाहिक जीवनात दुरावा येऊ देऊ नका, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात घरी पूर्ण वेळ द्याल आणि नोकरीही प्रामाणिकपणे कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.  

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जास्त वेळ देण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचे संबंध चांगले राहतील. या आठवड्यात तुम्ही काहीतरी दान करणार ज्यामुळे तुमच्या मनाला मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबातील सदस्याच्या कमजोर आरोग्यामुळे तुमचं मन उदास होऊ शकतं. कामात यश मिळेल पण आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पैशांचा व्यवहार जपून करावा. बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा काम बिघडू शकते. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जास्त वेळ देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या मध्यात विनाकारण काळजी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांबरोबर काही नवीन कामावर चर्चा होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही चांगली बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि कामातही गती येईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. ऑफिसमध्येही तुम्हाला लोकांचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळेल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता पूर्वीपेक्षा चांगली होईल. कामात चांगली कामगिरी कराल. व्यवसायात नवीन धोरण तयार करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात चांगली बातमी मिळण्याची पूर्ण आशा आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या आठवड्यात तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत यश मिळेल. जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीही मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तब्येतीत अशक्तपणा राहील, परंतु कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही कुठेतरी सहलीला जाऊ शकता. कौटुंबिक बाबतीत मोठे निर्णय घेणे टाळा. तुम्ही तुमच्या  जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवन चांगले जाईल, एकमेकांना वेळ द्या. आठवड्याच्या मध्यात तुमचे उत्पन्नही चांगले राहील. काळजी करण्याची काहीही गरज भासणार नाही. हा आठवडा तुमचा पूर्णपणे आनंददायी असणार आहे. फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. खर्चही वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

धनु 

या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या आठवड्यात नशीबही साथ देईल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. तुमच्या जीवनात काही चांगले बदल होतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आधी गुंतवलेल्या पैशांचा तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यात धनु राशीचे लोक आपल्या वेळेचा सदुपयोग करतील. तुमचे आरोग्यही चांगले राहील. ऑफिसमध्ये पूर्ण मनापासून काम कराल, ज्याचा फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि सर्व महत्त्वाची कामं पूर्ण कराल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक आहे. परदेशात जाण्याचाही बेत आखू शकता. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही चांगले करायचे असेल तर तुमच्यासाठी वेळ खूप चांगला आहे. वैवाहिक जीवनासाठी हा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मंदिरात तसेच धार्मिक स्थळांना भेट द्यावीशी वाटेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीत काही अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांत असेल, परंतु तुम्ही समजूतदारपणा दाखवाल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला जाणार आहे. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती दिसून येईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. शारीरिकदृष्ट्या कोणताही त्रास, वेदना जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवासात तुमचे पैसे खर्च करू शकता. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. प्रेम संबंध सामान्य राहतील. आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 13 August 2023 : मिथुन, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका टाळा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget