Weekly Horoscope 10 July To 16 July 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी घेऊन येणार सुवर्णसंधी; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 10 July To 16 July 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 10 July To 16 July 2023 : धनु, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक चांगल्या संधी घेऊन येणार आहे. हा आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने विशेष आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहे. चला जाणून घेऊया सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात संमिश्र असणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर उत्साही होऊ नका. विशेषत: ऑफिसमध्ये, चुकूनही कोणाशीही गुंतण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमचे विरोधक तुम्हाला ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. करिअर-व्यवसायात लक्षपूर्वक काम करा. कामाच्या बाबतीत अतिघाई करू नका. अन्यथा तुमचेच नुकसान होईल. आठवड्याच्या मध्यात तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते. या काळात तुम्हाला कौटुंबिक विषयांबाबत निर्णय घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकाने पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंधांना वेळ द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे आरोग्य चिंतेचा विषय बनू शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा पैसा आणि वेळेचे व्यवस्थापन करावे लागेल. तुमच्याकडे सर्व स्त्रोतांकडून धनाची आवक होईल, परंतु खर्चाचा अतिरेक त्यापेक्षा जास्त राहील. घर सजावटीचं काम, मुलांच्या गरजा, पर्यटन इत्यादींवर मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. नोकरदार व्यक्तींवर कामाचा अधिक ताण पडू शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कामामुळे अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या काळात हंगामी आजारांपासून सावध राहा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात शुभ होईल. तुमच्या मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक व्यक्तीला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा चांगला आहे अनेक नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या नोकरीतील प्रगतीमुळे कामाच्या ठिकाणीच नव्हे तर घर आणि कुटुंबात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील.
कर्क
कर्क राशीचे लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही छोट्या प्रवासाला जाण्याचा योग येईल. काही महत्त्वाच्या कामात मित्र तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. पालकांच्या आरोग्याची तुम्हाला सतत चिंता जाणवेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्चावर नियंत्रण राहील. उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवनात चांगला काळ येईल. व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रतेने चांगले परिणाम मिळतील.
सिंह
आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून काही मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होताना दिसतील. जर तुम्हाला काही काळ आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यात लक्षणीय सुधारणा होईल.
कन्या
आठवड्याची सुरुवात जीवनाशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात जाईल. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कामासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. जेवणाची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्यासमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावना व्यक्त करा.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली पण आठवड्याचा शेवट संमिश्र असेल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान हंगामी आजारांपासून सावध राहा. याबरोबरच या काळात खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. तुमच्या समस्यांकडे पाठ फिरवण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई करू नका आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमच्या पाठीशी असेल.
वृश्चिक
आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. अशा लोकांशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जे वारंवार तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. घाई करण्याऐवजी कोणतेही काम हुशारीने करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हंगामी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजाराच्या उद्रेकामुळे मन दुखू शकते. या दरम्यान तुमची जीवनशैली योग्य ठेवा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठांशी संबंध बिघडू देऊ नका.
धनु
आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी निगडीत अडचणी सुकर होताना दिसतील. मित्राच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब अंतराचा प्रवास करावा लागेल. नातेसंबंध विस्ताराच्या दृष्टीने प्रवास सुखकर आणि शुभ राहील. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाचा फायदा होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. वैवाहिक जीवनात सुख राहील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला एखादी नवीन संधी मिळेल ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.
कुंभ
कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. नोकरीत खूप मेहनत घेत असल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल पण नंतर तुम्हाला याचाच फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. व्यवसायासाठीही हा आठवडा चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रेम जीवनासाठी वेळ चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काही खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात, सावध राहा.
मीन
मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात यश मिळेल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. चुका टाळा आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील. वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :