Weekly Horoscope 08 May to 14 May 2023 : आजपासून सुरू होणारा आठवडा 'या' राशींसाठी खूप खास! 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 08 May to 14 May 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 08 May to 14 May 2023 : मे महिन्याचा दुसरा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांच्या हालचाली देखील बदलणार आहेत. हा आठवडा कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल? हे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहणार आहे. या आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायाशी संबंधित सर्व लोकांना लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. जेवण आणि दिनचर्येची काळजी घेतल्यास तुमचे आरोग्यही चांगले राहील. प्रेम आणि वैवाहिक संबंधात परिस्थिती सामान्य राहील.
वृषभ
मे महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी ठरेल. या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे मानसिक तणावाची स्थिती राहील. या आठवड्यात कोणतेही काम काळजीपूर्वक करणे चांगले राहील. कारण घाईने उचललेले पाऊल तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.
मिथुन
आर्थिकदृष्ट्या मे महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी फारसा चांगला नसणार आहे. या आठवड्यात तुमचे खर्च वाढतील, परंतु तुम्ही तुमचे दैनंदिन खर्च भागवू शकाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताणही राहील. इतरांनी सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील. प्रेमप्रकरणासाठीही वेळ अनुकूल नाही आणि वैवाहिक जीवनातही मतभेद होऊ शकतात.
कर्क
मे महिन्याचा दुसरा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी पहिल्या आठवड्यापेक्षा चांगला राहील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील. व्यवसाय, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी काळ शुभ राहील. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला हा त्रास जास्त काळ जाणवणार नाही. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरपासून व्यवसायात लाभ मिळतील आणि तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कन्या
मे महिन्याचा दुसरा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या दरम्यान तुमचे नशीब बदलू शकते. नोकरी-व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील आणि उत्पन्नाचे अनेक स्रोतही निर्माण होतील. कुटुंबासाठीही वेळ अनुकूल असेल आणि या आठवड्यात तुम्ही संकटांपासून मुक्त व्हाल. तुमचे प्रेम जीवन चांगले राहील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांवर या आठवड्यात कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांबद्दलही तुमचे मन थोडे चिंतेत राहू शकते. पण आठवड्याच्या उत्तरार्धात समस्या कमी होऊ लागतील. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले जातील.
वृश्चिक
मे महिन्याचा दुसरा आठवडा वृश्चिक राशीसाठी आव्हानांनी भरलेला असू शकतो. या आठवड्यात तुम्हाला घर, कुटुंब, करिअर किंवा व्यवसाय इत्यादींशी संबंधित चिंता भासू शकतात. पण तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हा आजार अधिक बळावण्याची शक्यता आहे. नोकरीतही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि व्यवसायातही मंदी येऊ शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतेही काम अतिशय विचारपूर्वक किंवा सल्लामसलत करून करावे. अन्यथा समस्या वाढू शकते. नोकरदार महिलांनाही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, मकर राशीच्या तरुणाईचा हा काळ अत्यंत मजेत जाईल. विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच पैशांच्या बाबतीत, बजेट बनवा. पैसे जपून खर्च करा. जोडीदाराबरोबर आनंदात वेळ जाईल.
कुंभ
मे महिन्याचा दुसरा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. याबरोबरच तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने काही मोठे काम कराल आणि त्यात यशस्वीही व्हाल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. यासोबतच अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्यही कामाच्या ठिकाणी राहील. आर्थिकदृष्ट्याही तुमचा आठवडा चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठीही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा संमिश्र जाणार आहे. करिअर आणि बिझनेससाठी काही कामं अत्यंत काळजीपूर्वक करावी लागतील नाहीतर संकटांचा साना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. परंतु आठवड्याच्या उत्तरार्धात, समस्यांचे निराकरण होण्यास सुरुवात होईल. या काळात जोडीदाराशी चांगले संबंध ठेवा. अनावश्क वाद टाळा. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :