(Source: ECI/ABP News/ABP Majha)
August Grah Gochar 2024 : ऑगस्टमध्ये त्रिग्रही राजयोगामुळे 'या' राशींचं नशीब पालटणार; कुबेराच्या आशीर्वादाने उघडणार धनाचा पिटारा
August Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात काही मोठे ग्रह आपल्या चाली बदलणार आहेत. यामुळे असा योग तयार होईल, ज्याचा थेट फायदा 4 राशींच्या व्यक्तींना होईल.
Grah Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्याचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यात दिसून येतो. ऑगस्ट महिन्यातही काही खास ग्रह आपल्या चाली बदलणार आहेत. ज्यामध्ये सूर्य (Sun), बुध (Mercury), शुक्र (Venus) आणि मंगळ (Mars) यांचा समावेश आहे. या ग्रहांच्या संक्रमणामुळे त्रिग्रही, बुधादित्य आणि समसप्तक राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा फायदा मुख्यत्वे 4 राशींना होणार आहे.
अशा बदलणार ग्रहांच्या चाली
16 ऑगस्टला सूर्य (Sun) सिंह राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामुळे सिंह राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्राचा त्रिग्रही योग तयार होईल. हा योग 16 ते 22 ऑगस्टपर्यंत राहील. शुक्र (Venus) 25 ऑगस्टला कन्या राशीत प्रवेश करेल आणि 25 दिवस तेथे राहील. बुध (Mercury) 5 ऑगस्टला सिंह राशीत मागे जाईल आणि 29 ऑगस्टला थेट चाल चालेल. 26 ऑगस्टला मंगळ (Mars) मिथुन राशीत प्रवेश करेल.
मेष (Aries Horoscope)
या एक महिन्याच्या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
सिंह (Leo Horoscope)
सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमची प्रभावशाली लोकांशी भेट होईल.
मकर (Capricorn Horoscope)
या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायात फायदा होईल, वडिलोपार्जित संपत्तीबाबत चांगली बातमी मिळू शकते.
कन्या (Virgo Horoscope)
तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात वाढ होईल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: