Weekly Horoscope 03 To 09 February 2025 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 03 To 09 February 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.

Weekly Horoscope 03 To 09 February 2025 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. फेब्रुवारीचा पहिला आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमचा व्यवसायिक दृष्टीकोन चांगला असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमचं आरोग्य ठणठणीत असेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यापुढे उपलब्ध होतील. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. तसेच, या आठवड्यात पिवळ्या वस्तूंचं दान करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. गरजूंना मदत करा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्याचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. तसेच, हा आठवडा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी फार चांगला असणार आहे. तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चिंता जाणवेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चिंतेने तुम्हाला कासाविस वाटेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा नवीन आठवडा लाभदायक असेल. तुमच्या नोकरीची स्थिती फार चांगली असेल. तुमच्यावर अवलंबून इतर अनेक लोक असतील. तुमचा व्यवसाय मध्यम स्वरुपात चालेल. ना फायदा ना तोटा अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात काळ्या वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. ध्यान आणि योगासन करा.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आनंददायी असणार आहे.नवीन आठवड्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तसेच, तुमचा व्यवहार चांगला चालेल. आठवड्याच्या सुरुवातीला पैशांचा थोडा जपून वापर करा. अन्यथा तुम्हाला आठवड्याच्या शेवटी पैशांची कमतरता भासू शकते. तुमच्या कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्याचा नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमच्या वागण्या-बोलण्यात उत्साह जाणवेल.तसेच, आठवड्याच्या शेवटी धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. मित्र-परिवाराबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान करा.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात आपल्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला दुखापत होऊ शकते.नोकरदार वर्गातील लोकांची कामाची स्थिती चांगली असेल. तुम्हाला कामात कोणताच त्रास होणार नाही. सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. या आठवड्यात पिवळ्या वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी शुभ ठरु शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. व्यवसायायिक दृष्टीने बोलायचं झाल्यास, तुमचा व्यवसाय सुरळीत चालू राहील. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. या आठवड्यात नकारात्मक लोकांपासून दूर राहा. त्याचा परिणाम तुमच्या वागणुकीवर आणि कामावर होऊ शकतो. मुलांना या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. व्यावसायिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही एकादी रिस्क देखील या कालावधीत घेऊ शकतात. तसेच, नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. या आठवड्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होणार नाही. त्यामुळे कोणाकडून विनाकारण अपेक्षा ठेवू नका. तसेच, लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुमच्या गोष्टी इतरांशी शेअर करु नका. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर चांगलं वर्तन करण्याची गरज आहे.अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. सामंजस्याने करार करा. इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच, सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. आरोग्याच्या बाबतीत महिलांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे कोणतीही जोखीम घेऊ नका. तसेच, तुमच्या प्रेम जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर असेल. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी करु नका. पैशांची बचत करायला सुरुवात करा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
बुधादित्य, रवि योगासह बनले मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
