एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी चढ-उतार घेऊन येईल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तितकं मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात काही अडथळे येऊ शकतात. भावनेने किंवा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळावं, अन्यथा तुमचं काम बिघडू शकतं.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाईल, तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला बदली किंवा बढतीची संधी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीचा फायदा होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची कामं वेळेवर पूर्ण कराल. तुम्हाला तुमचे मित्र आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमची तुमच्या बॉसशी जवळीक वाढेल. प्रेमसंबंधांचे विवाहात रुपांतर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. या आठवड्यात मनावर ताबा ठेवा. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला काही घरगुती समस्यांचाही सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचं मन तणावात राहील. तुमच्या प्रियकरासोबत एखाद्या गोष्टीबाबत गैरसमज होऊ शकतात.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. या आठवड्यात नशीब तुमची साथ देईल. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखता येईल. कार्यालयात तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात वाढ होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. जोडीदारासोबत प्रेमसंबंध चांगले राहतील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुमची प्रलंबित आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील. व्यवसायासाठी हा आठवडा शुभ आहे. प्रवासामुळे मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत होऊ शकतो. या काळात तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. प्रियकराकडून मोठं सरप्राईज मिळू शकतं.

तूळ रास (Libra Weekly Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्यावर कामाची जबाबदारी असेल. तुम्ही प्रामाणिकपणे या जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील वातावरण प्रसन्न पाहायला मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध असण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीत तुम्ही पैसे जपून वापरणं गरजेचं आहे. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा नवीन आठवडा मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणाच्याच बोलण्यात येऊ नका. कोणीही तुमचा विश्वासघात करु शकतं. तसेच, या आठवड्यात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अधिक सतर्क असण्याची गरज आहे.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी धावपळ करावी लागेल. या काळात डोक्यावर अतिरिक्त कामाचा भार असेल, ज्यामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक थकवा देखील येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा नोकरीत बदलाची अपेक्षा करणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. आठवड्याच्या शेवटी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा स्थितीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकांच्या छोट्या गोष्टींना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ  व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे बाहेर येतील. या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित समस्या दूर होतील, तुमचं कुटुंब तुमचं नातं स्वीकारू शकेल आणि तुमच्या लग्नाचा विचार करू शकेल. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

या आठवड्यात कोणतंही काम घाईने करणं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणतंही काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः करणं चांगलं. या आठवड्यात तुमच्यावर दुसऱ्याकडून चुकीचा आरोपही होऊ शकतो, अशा परिस्थितीत अत्यंत सावधगिरीने आणि हुशारीने वागा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वाहन जपून चालवा. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरीने करा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवड्याचे मधले दिवस खूप शुभ राहतील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. आठवड्याच्या शेवटी घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

December Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी डिसेंबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat PC :  दाढीला हलक्यात घेऊ नका.. संजय शिरसाट यांचा Sanjay Raut यांना थेट इशाराSanjay Shirsat on Sanjay Raut : .... तर डम्पिंग ग्राऊंड गाठावं लागेल - शिरसाटTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 2 डिसेंबर 2024: ABP MajhaNaresh Mhaske on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Raveena Tandon : ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Embed widget