(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा आता सुरू होत आहे, त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी चढ-उतार घेऊन येईल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तितकं मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात काही अडथळे येऊ शकतात. भावनेने किंवा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळावं, अन्यथा तुमचं काम बिघडू शकतं.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाईल, तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला बदली किंवा बढतीची संधी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीचा फायदा होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची कामं वेळेवर पूर्ण कराल. तुम्हाला तुमचे मित्र आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमची तुमच्या बॉसशी जवळीक वाढेल. प्रेमसंबंधांचे विवाहात रुपांतर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. या आठवड्यात मनावर ताबा ठेवा. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला काही घरगुती समस्यांचाही सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचं मन तणावात राहील. तुमच्या प्रियकरासोबत एखाद्या गोष्टीबाबत गैरसमज होऊ शकतात.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. या आठवड्यात नशीब तुमची साथ देईल. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखता येईल. कार्यालयात तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात वाढ होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. जोडीदारासोबत प्रेमसंबंध चांगले राहतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुमची प्रलंबित आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील. व्यवसायासाठी हा आठवडा शुभ आहे. प्रवासामुळे मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत होऊ शकतो. या काळात तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. प्रियकराकडून मोठं सरप्राईज मिळू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :