Virgo Horoscope Today 12th March 2023 : मानसिकदृष्ट्या समतोल राखा, आरोग्य जपा; कन्या राशीसाठी महत्त्वाचा सल्ला
Virgo Horoscope Today 12th March 2023 : आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कामात तुम्ही घेतलेल्या तुमच्या मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल.
Virgo Horoscope Today 12th March 2023 : आज कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला नोकरीमध्ये काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधीही मिळतील.
जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल
आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कामात तुम्ही घेतलेल्या तुमच्या मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे विशेषत: मुलांकडून कौतुक होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकदृष्ट्या वातावरण अनुकूल राहील.
मानसिकदृष्ट्या समतोल राखा
आज घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. अनपेक्षित लाभ होईल नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. मानसिकदृष्ट्या समतोलता राखा. आपलं आरोग्य जपा.
आज कन्या राशीचे आरोग्य :
आरोग्य चांगले राहील, परंतु कामाच्या जास्त दबावामुळे शारीरिक थकवा येऊ शकतो. एखाद्याशी झालेल्या वादामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता.
कन्या राशीसाठी आजचे उपाय :
आज कन्या राशीसाठी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरेल. देवी लक्ष्मीची पूजा करा आणि श्रीसूक्ताचे पठण करा.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :