एक्स्प्लोर

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी; पूजा विधी, शुभ योग-मुहूर्त आणि खास उपाय जाणून घ्या

Ashadh Vinayak Chaturthi 2024 : हिंदू धर्मात विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा केली ते सारे कष्ट दूर होतात आणि सुखाची नांदी होते.

Vinayak Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकंष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) व्रत पाळलं जाते. यावर्षी आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवारी, 9 जुलै रोजी येत आहे. या दिवशी गणपती आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो, त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. त्यानुसार विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधीचा असणार आहे या संदर्भात जाणून घेऊया. 

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त  (Vinayak Chaturthi 2024 Muhurta)

चतुर्थी प्रारंभ - 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी

चतुर्थी समाप्ती - 10 जुलै रोजी 7 वाजून 51 मिनिटांनी

उदय तिथीनुसार, 9 जुलै रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल.

पूजेचा शुभ मुहूर्त - पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 3 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 50 मिनिटापर्यंत आहे. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 40 मिनिटांचा आहे.

आषाढी विनायक चतुर्थीचे शुभ योग (Ashadhi Vinayak Chaturthi Shubh Yog)
 
विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी अंगारक योग, रवियोग, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे शुभ योग तयार होत आहेत. विनायक चतुर्थीला रवि योग सकाळी 7 वाजून 52 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 31 मिनिटापर्यंत आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 5 वाजून 30 मिनिटे ते 7 वाजून 52 मिनिटापर्यंत आहे. आश्लेषा नक्षत्र देखील सकाळी 7 वाजून 52 मिनिटापर्यंत आहे. त्यानंतर मघा नक्षत्र असेल.

विनायक चतुर्थी पूजा विधी (Vinayak Chaturthi Puja Vidhi)

सकाळी लवकर उठावं. देवघर स्वच्छ करुन देवपूजा करावी. गणपतीला जलाभिषेक करा. बाप्पाला फुलं, फळं अर्पण करून पिवळं चंदन लावा. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आषाढी विनायक चतुर्थी व्रताची कथा वाचा. ॐ गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपती बाप्पाची आरती करा. शक्य झाल्यास जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या. चंद्राला अर्घ्य अर्पण करा. शक्य असल्यास उपवास करा, यादिवशी मांसाहार करू नका.

चंद्रोदयाची वेळ

विनायक चतुर्थी, 9 जुलै रोजी असून, चंद्रोदय सकाळी 8:25 वाजता होईल आणि चंद्रास्ताची वेळ रात्री 9:58 वाजता असेल. या दिवशी चंद्र पाहणं निषिद्ध मानलं जातं, कारण चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागतो असं म्हणतात.

विनायक चतुर्थी उपाय (Vinayak Chaturthi Remedies)

पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावं. अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेश मंत्रांचा जप करावा आणि सुख-समृद्धीची कामना करावी. गणेशाच्या पूजेच्या वेळी पती-पत्नीने एकत्र बसून 'ॐ वक्रतुंडय नम:' या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार बाप्पाची विशेष कृपा, सुख-समृद्धीत होणार वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
Vastu Tips : पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र
पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget