एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी दिवशी बनले दुर्मिळ योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी पाळली जाते. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

Vinayak Chaturthi 2024 : आज, म्हणजेच 10 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) व्रत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे, तसेच या दिवशी उपवास ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होतं, गणपतीच्या कृपेने सर्व दु:ख दूर होतात.

विनायक चतुर्थीला गणेशाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळतं. विनायक चतुर्थी व्रत हे महिन्यातून एकदाच येतं. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला काही विशेष योग तयार होत आहेत, यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. या शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा केल्याने चौपट फळ मिळू शकतं.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2024 Shubh Muhurta)

हिंदू कॅलेंडरनुसार, चतुर्थी तिथी 9 जून रोजी म्हणजेच, काल दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी सुरू झाली आहे आणि ही तिथी 10 जून रोजी, म्हणजेच आज दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. विनायक चतुर्थीच्या पूजेची वेळ 10 जून रोजी सकाळी 10:57 ते दुपारी 01:44 पर्यंत असेल.

विनायक चतुर्थी 2024 शुभ योग (Vinayak Chaturthi 2024 Shubh Yog)

आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.

गणपतीची पूजा करण्याची पद्धत (Ganesh Puja Vidhi)

सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर प्रसाद म्हणून गणेश मंदिरात एक नारळ आणि मोदक घेऊन जा. बाप्पाला गुलाबाची फुलं आणि दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 27 वेळा जप करा आणि अगरबत्ती अर्पण करा. दुपारच्या पूजेच्या वेळी आपल्या घरात आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे, माती किंवा सोन्या-चांदीची गणेशमूर्ती स्थापित करा. यानंतर गणपतीची पूजा आणि आरती करून मुलांना मोदकांचं वाटप करावं.

विनायक चतुर्थी उपाय (Vinayak Chaturthi Remedies)

1. या दिवशीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला दुर्वाची माळ अर्पण करा. त्यानंतर तूप आणि गूळ अर्पण करा. संपत्ती मिळावी किंवा अडकलेले पैसे परत मिळावेत, यासाठी प्रार्थना करा आणि पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला किंवा गरजूंना वाटून टाका.

2. जीवनातील कोणत्याही प्रकारचं दुःख आणि संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या समोर चतुर्मुखी दिवा लावा. याशिवाय या दिवसाच्या पूजेमध्ये तुमच्या वयानुसार तितके लाडू वापरा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि इतरांना वाटा. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचे 3 वेळा पठण करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींना होणार अफाट लाभ, आर्थिक स्थिती उंचावणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget