Vasu Baras 2024 : वसुबारस सण का साजरा करतात? जाणून घ्या पूजा पद्धत, विधी आणि शुभ मुहूर्त
Vasu Baras 2024 : गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन केलं जातं.
Vasu Baras 2024 : हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2024) हा सर्वात मोठा सण मानला जातो. यामध्येच दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने (Vasu Baras) केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे.
वसुबारसचं महत्त्व काय?
गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन केलं जातं. गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसेच, चारा खायला दिला जातो. . तिला गंध लावून गाईची पूजा केली जाते. तसेच, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही गाईची पूजा करण्याचं महत्त्व आहे.
वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त (Vasu Baras Shubh Muhurta 2024)
वसुबारस तिथीची सुरुवात : सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपासून सुरु झाला आहे. तर, मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असेल.
काय आहे वसुबारसची प्रथा? (Vasu Baras History 2024)
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :