Vastu Tips : किचन ओट्यावर 'या' 3 गोष्टी सांडणं म्हणजे अनर्थ; मिळतं साडेसातीला आमंत्रण, वाढत्या क्लेशासह होईल चौफेर नुकसान
Vastu Tips : वास्तु शास्त्रानुसार, काही गोष्टी वारंवार पडणं, सांडणं शुभ मानलं जात नाही. या संबंधित स्वयंपाकघरात जेवण बनवतानाही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्याचे अनिष्ट परिणाम भविष्यात भोगावे लागतात.
Vastu Tips : अनेकदा आपल्या हातून चुकून काही गोष्टी पडतात किंवा सांडतात. आपण पडलेल्या वस्तू उचलून त्यांच्या जागी ठेवून देतो, सांडलेल्या वस्तू भरुन ठेवतो. त्यावर जास्त विचार करत नाही. पण वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips), या गोष्टी काही अशुभ संकेत देत असतात. काही गोष्टी वारंवार पडणं शुभ मानलं जात नाही. स्वयंपाकघरात अशा गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
स्वयंपाकघरात काम करताना एखाद्या गोष्टी इकडे तिकडे सांडणं ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु वास्तूत हे अशुभ मानलं जातं आणि या गोष्टी भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचे संकेत देत असतात. किचन ओट्यावर कोणत्या गोष्टी सांडणं अशुभ मानलं जातं? जाणून घेऊया.
स्वयंपाकघरात काम करताना 'या' गोष्टीं सांडणं असतं अशुभ
दूध उतू जाणे
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात दूध उकळत असताना अनेक वेळा दूध उतू जातं. किचनमध्ये दूध उतू जाणं हे देखील अशुभ संकेत देतं. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरात दूध वारंवार सांडत असेल, तर ते तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची कमजोरी दर्शवते. दूध उतू जातं म्हणजे लवकरच आपल्यासोबत काही अनिष्ट गोष्टी घडणार आहेत, याचे हे संकेत असतात.
मीठ सांडणे
वास्तुशास्त्रानुसार, जर किचनमध्ये मीठ सांडले तर ते अशुभ समजलं जातं. किचनमध्ये मीठ कधीही सांडू देऊ नये. मीठ हे चंद्र आणि शुक्राचं प्रतीक मानलं जातं. स्वयंपाकघरात मीठ वारंवार पडत असेल, तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
तेल सांडणे
हिंदू धर्मात मोहरीच्या तेलाचा संबंध शनिदेवाशी आहे. अशा परिस्थितीत जर स्वयंपाकघरात मोहरीचं तेल वारंवार सांडत असेल, तर ते शुभ लक्षण मानलं जात नाही. वास्तूनुसार, यामुळे व्यक्तीला शनिशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अशा व्यक्तीच्या मागे शनीची साडेसाती लागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Vastu Tips : लग्नाला विलंब, प्रगतीत अडथळे? घरात ठेवलेल्या 'या' वस्तू तर नाहीत ना जबाबदार?