Vastu Tips : लग्नाला विलंब, प्रगतीत अडथळे? घरात ठेवलेल्या 'या' वस्तू तर नाहीत ना जबाबदार?
Late Marriage Remedies : घरात ठेवलेल्या वस्तूंचा थेट संबंध तुमच्या नशिबाशी असतो. काही वेळा घरातील अशुभ वस्तू वास्तू दोष निर्माण करतात, ज्यामुळे प्रगतीच्या मार्गात अडचणी येतात आणि कधी कधी विवाहास देखील विलंब होतो.
Vastu Dosh Effects : आपल्या घरात अशा बऱ्याच अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात, ज्याचा वापर आपण अधूनमधून करतो. या वस्तू आपण जास्त वापरतही नाही, मात्र तरीही त्या वर्षानुवर्षे घरात पडून असतात. अशा गोष्टींचा संबंध थेट तुमच्या नशिबाशी असतो, या गोष्टी घरात ठेवल्याने घराची अधोगती सुरू होती, प्रगतीचे मार्ग बंद होतात. नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्या वाईट काळाला जबाबदार ठरतात? जाणून घेऊया.
बंद पडलेले कुलूप
आपण घर लॉक करण्यासाठी कुलूपांचा वापर करतो, पण काही वेळा जुनी कुलूपं घरात ठेवली जातात. कधी-कधी घरात पडून राहिलेल्या या कुलुपांची चावी हरवलेली असते, तर कधी-कधी त्यांना गंज लागलेला असतो, कधी कधी हे कुलूप जॅम होऊन उघडत नाहीत. तर याच कुलुपांमध्ये तुमच्या नशिबाची चावी दडलेली असते.
ज्या कुलुपांची चावी हरवली आहे, अशी कुलुपं घरात ठेऊ नये. खराब झालेली कुलुपं घरात ठेऊ नये. हे बंद कुलूप तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणू शकतात आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणू शकतात.
लग्नाला होतो विलंब
घरातील खराब झालेले कुलूप घरातील अविवाहित मुला-मुलींशी संबंधित असतात. बंद कुलूप घरात असल्याने घरातील मुला-मुलींच्या लग्नात अडथळे येऊ शकतात, याने लग्न ठरण्यास विलंब होऊ शकतो. जुनी आणि बंद कुलूपं नशिबाचं टाळं बंद करण्याबरोबरच दारात आलेल्या संधीही माघारी लावतात. त्यामुळे घरात चुकूनही खराब झालेलं कुलूप ठेऊ नका.
सकारात्मकता आणि चांगल्या आरोग्यासाठी वास्तु टिप्स
- वास्तूनुसार जुन्या आणि निरुपयोगी वस्तू बेडरूममध्ये ठेवू नये.
- जुने शूज आणि चप्पल ताबडतोब बाहेर काढा.
- बेडरूमच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी. अस्वच्छ बेडरूममुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
- घरातील बिघडलेला नळ त्वरित दुरुस्त करा. नळातून टपकणारे पाण्याचे थेंब अशुभ मानले जातात.
- उत्तम आरोग्यासाठी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणं वास्तूमध्ये फायदेशीर मानलं जातं. यामुळे तणाव कमी होतो, असं मानलं जातं.
- वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबऱ्याजवळ जास्त कचरा जमा होऊ देऊ नये, याचा आरोग्यावर परिणाम होतो.
- घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा.
- जर तुमचा बीपी उच्च राहत असेल तर तुम्ही घरामध्ये स्पायडर प्लांट लावू शकता. यामुळे तुमच्या सभोवतालची हवाही स्वच्छ होईल.
- चांगल्या झोपेसाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एक लहान लॅव्हेंडर प्लांट देखील ठेवू शकता. यामुळे तणाव कमी होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :