Vastu Tips : जास्वंदीचं फूल करेल आर्थिक तंगी दूर; 'हे' 5 उपाय करुन पाहा, प्रत्येक पावलावर मिळेल नशिबाची साथ
Hibiscus Flower Remedies : वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फूलाला विशेष महत्त्व आहे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी जास्वंदीच्या फूलाचा वापर होतो. देवी लक्ष्मीला जास्वंदीचं फूल अर्पण केल्याने देखील लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. जास्वंदीच्या फूलाचे वास्तू उपाय जाणून घेऊया.
Hibiscus Flower Remedies : वास्तुशास्त्रात सुखी जीवनासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचं निद्रीस्त नशीब देखील जागृत होऊ शकतं. फुलांना सकारात्मक उर्जेचं प्रतीक मानलं जातं, त्यात जास्वंदाचं फूल (Hibiscus Flower) अतिशय शुभ मानलं जातं. तुम्हाला तुमचं नशीब साथ देत नसेल तर तुम्ही या फुलाचा वापर करू शकता, यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात पैशाची कमतरता भासणार नाही. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या फुलाचे उपाय जाणून घेऊया.
कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि पैसा मिळवण्याचे उपाय
जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर यावरही एक सोपा उपाय आहे. शुक्रवारी गणपती बाप्पा आणि देवी दुर्गा यांचं ध्यान करा, यानंतर पाच जास्वंदीची फुलं घेऊन आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. हे किमान 7 दिवस करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळते आणि घरात पैसा टिकून राहतो.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपाय
जर तुमच्या घरात नेहमी पैशाची कमतरता भासत असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा अवश्य वापर करा. सूर्यदेवाची पूजा करताना जास्वंदीचं फूल अर्पण करावं. जास्वंदीचं फूल तांब्याच्या कलशात ठेवावं, त्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावं, यामुळे घरातील आर्थिक तंगी दूर होईल.
घरातील सुख शांतीसाठी उपाय
तुम्ही जास्वंदीचं रोप लावल्यास तुमच्या घरात सकारात्मकता राहील. त्यासाठी योग्य दिशाही जाणून घेतली पाहिजे. जास्वंदीचं फूल पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं, यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होते. परंतु जास्वंदीची रोपं कधी सुकू नयेत, हे लक्षात ठेवा.
पती-पत्नीमध्ये प्रेम वाढवण्याचे उपाय
पती-पत्नीमधील गैरसमज दूर करण्यासाठी जास्वंदीचं फूल खूप फायदेशीर आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडण होत असेल आणि अनेक प्रयत्न करूनही तुमच्यात परस्पर समंजसपणा निर्माण होत नसेल, तर तुम्हाला उशीखाली जास्वंदीचं फूल घेऊन झोपावं लागेल. यामुळे तुमच्यामध्ये प्रेमाची भावना पसरेल.
व्यवसाय आणि नोकरीत यश मिळवण्याचे उपाय
जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीला जास्वंदीच्या फुलांसह साखरेचा प्रसाद द्यावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमची नेहमी प्रगती होत राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: