(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : नवीन घर, दुकान घेण्याचा विचार करताय? वास्तूशी संबंधित 'हे' 7 नियम लक्षात घ्या, लक्ष्मीची कृपा सदैव राहील
Vastu Tips : जर तुम्हीही नवीन घर किंवा दुकान विकत घेण्याचा विचार करत असाल तर वास्तूशी संबंधित या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. हे 7 नियम कोणते ते जाणून घेऊयात.
Vastu Tips : वास्तूशास्त्राचा वापर घर, दुकान किंवा व्यवसायात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी केला जातो. वास्तूनुसार (Vastu Shastra) बनविलेल्या वस्तू आयुष्यात सुख-समृद्धी आणतात आणि त्यांच्यावर सतत देवी लक्ष्मीची कृपा असते असं म्हणतात. जर तुम्हीही नवीन घर किंवा दुकान विकत घेण्याचा विचार करत असाल तर वास्तूशी (Vastu Tips) संबंधित या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. हे 7 नियम कोणते ते जाणून घेऊयात.
घर आणि दुकानाशी संबंधित वास्तूचे 'हे' नियम
1. वास्तूशास्त्रात दिशेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार, तुमचं घर किंवा दुकानाचं मुख्य द्वार पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. तसेच, घरात पूजेचं स्थान ईशान्य दिशेला असावं. तर, बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावं. तर, किचन अग्नि कोण म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेला असावी.
2. घर किंवा दुकानाचा आकार हा वर्गाकार किंवा आयताकार असावा. अनियमित आकाराचे भवन वास्तूनुसार अशुभ मानले जाते.
3. वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, घर किंवा दुकानात जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात. जेणेकरून, घरात सूर्यप्रकाश आणि हवा अगदी सहज आत येईल. घरातील खिडक्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला असाव्यात.
4. वास्तूशास्त्रानुसार, घराचं मुख्य द्वार मोठं आणि भव्य असावं. तसेच, घराच्या मुख्य दारी कोणत्याच प्रकारची अडगळ असू नये.
5. वास्तूशास्त्रानुसार, घर किंवा दुकानासाठी नेहमी हलक्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा वापर करावा. या रंगांनी घरात सकारात्मकता वाढते.
6. घर किंवा दुकानाच्या शेजारी तुळस, मनी प्लांट किंवा एलोवेरा सारख्या रोपांचा वापर करावा. काटेरी झुडुपं घरासमोर लावू नका.
7. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल दुकानात श्रीयंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, किंवा कासव ठेवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :