एक्स्प्लोर
Advertisement
Vastu Tips : घरात सुख-शांतीसाठी धातूनिर्मित कासव ठेवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
Vastu Tips For Keeping Tortoise In Home : वास्तूशास्त्रानुसार, शुक्रवार, बुधवार आणि गुरूवारी घरात कासवाची मूर्ती स्थापित करणं लाभदायक मानतात.
Vastu Tips For Keeping Tortoise In Home : आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी वास्तूच्या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips), घरात कासव (Tortoise) ठेवल्याने धन-संपत्तीत वाढ होते असं म्हणतात. तसेच, घरात धातूयुक्त कासव ठेवणं लाभदायक मानण्यात आलं आहे. याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कासव ठेवण्याचे वास्तू नियम
- वास्तूनुसार, घरात जीवंत कासव ठेवावा की ठेवू नये हे प्रत्येक व्यक्तिगणिक आहे. पण यामुळे घरता नकारात्मकता येते असं म्हणतात. तसेच, तुमच्या कौटुंबिक जीवनात अनेक अडथळे येतात.
- जर तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवू इच्छिता तर, लाकडाचा, क्रिस्टल किंवा धातूनिर्मित कासव तुम्ही घरात ठेवू शकता.
- वास्तूशास्त्रानुसार, शुक्रवार, बुधवार आणि गुरूवारी घरात कासवाची मूर्ती स्थापित करणं लाभदायक मानतात.
- वास्तूशास्त्रात, घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवतेचं स्थान असतं असं म्हणतात. या दिशेला कासवाची मूर्ती स्थापित केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात.
- वास्तूशास्त्रात, घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लाकडाचा कासव स्थापित करणे फार शुभकारक मानले जाते. यापासून अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात. तसेच, घरातील प्रत्येक गोष्टीत यश मिळतं.
- नोकरी किंवा व्यवसायात जर प्रगती मिळवायची असेल तर तुम्ही चांदीचा कासव ठेवू शकता.
- याव्यतिरिक्त मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये उत्तर-पश्चिम दिशेला धातूचा कासव ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते असं म्हणतात.
कासव ठेवण्याचे फायदे
- घरात लाकूड किंवा धातूंपासून बनविलेला कासव स्थापन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
- घरात कासव ठेवल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतात.
- मान्यतेनुसार, घराच्या मुख्यद्वारापाशी कासव ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.
- क्रिस्टील निर्मित कासव घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला स्थापित केल्याने सामाजिक पद-प्रतिष्ठेत वृद्धी होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology Tips : शनिवार की रविवार? आठवड्याच्या 'या' दिवशी नवीन कपडे घालणं अशुभ; वाढत जातील अडचणी, पाण्यासारखा पैसा होईल खर्च
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
सोलापूर
शिक्षण
Advertisement