Astrology Tips : शनिवार की रविवार? आठवड्याच्या 'या' दिवशी नवीन कपडे घालणं अशुभ; वाढत जातील अडचणी, पाण्यासारखा पैसा होईल खर्च
Astrology Tips : हिंदू धर्ममान्यतेनुसार, आठवड्यातून तीन दिवशी नवीन कपडे घालणं फार अशुभ मानले जाते.
Astrology Tips : हिंदू धर्ममान्यतेनुसार, काही विधी, कार्य असे आहेत की ते करण्यासाठी एक शुभ दवस निश्चित केला जातो. जर तुम्ही याच्या विरोधात गेलात तर त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. त्यानुसार, कोणत्या दिवशी नवीन कपडे (Cloths) घालणं शुभ आणि कोणत्या दिवशी अशुभ असते हे जाणून घेणार आहोत.
नवीन कपडे परिधान करण्यासाठी हे तीन दिवस अशुभ
हिंदू धर्ममान्यतेनुसार, आठवड्यातून तीन दिवशी नवीन कपडे घालणं फार अशुभ मानले जाते. यामध्ये रविवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी नवीन कपडे घालू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार, हे तीन दिवस नवीन कपडे परिधान करण्यासाठी अशुभ मानले जातात. रविवारी नवीन कपडे परिधान केल्याने सूर्य ग्रह दोषाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
तर, मंगळवारी नवीन कपडे परिधान केल्याने व्यक्तीला प्रत्येक वेळी राग, क्रोध येऊ शकतो. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळेल की नाही याबाबत शंका असते. तर, कपडेही लवकर फाटू लागतात अशी मान्यता आहे.
शनिवारी नवीन कपडे का परिधान करू नयेत?
असं म्हणतात की शनिवारी नवीन कपडे परिधान करू नयेत. यामुळे शनीदेव नाराज होऊ शकतात. तसेच, ग्रहदोष वाढण्याच्या शक्यतासुद्धा निर्माण होऊ शकते. तसेच, यामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शनिवारी चुकूनही नवीन कपड्यांची खरेदी करू नका.
कोणता दिवस शुभ?
तुम्हाला जर नवीन कपडे परिधान करायचे असतील तर, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तुम्ही परिधान करू शकतात. हे दिवस शुभ मानले जातात. तसेच, सोमवारीसुद्धा नवीन कपडे परिधान करणं टाळावंच.
अशुभ दिनी नवीन कपडे परिधान करण्याचे उपाय
जर एखाद्या व्यक्तीने चुकून किंवा काही कारणास्तव अशुभ दिनाच्या दिवशी नवीन कपडे परिधान केले असतील तर यापासून दूर राहण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही चिमूटभर मीठ घेऊन ते पाण्यात टाकून नवीन कपड्यांवर शिंपडू शकता. यामुळे ग्रहदोषापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: