Vastu Tips : लाख प्रयत्नानंतरही नोकरी मिळत नाहीये? फॉलो करा वास्तूच्या या 5 टिप्स; घरबसल्या मिळेल नोकरीची ऑफर
Vastu Tips For Job : नोकरी मिळवण्यात तुमचं शिक्षण आणि तुमची पात्रता या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर नशिबाचीही साथ असावी लागते.
Vastu Tips For Job : वास्तू हे एक प्राचीन शास्त्र आहे. वास्तू (Vastu Tips) आपल्या जीवनात अनेक पैलू सुधारण्यास मदत करतात. असं म्हटलं जातं की जर आयुष्यात प्रगती करायची असेल तर वास्तूच्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात पाहिलं तर सगळीकडे स्पर्धात्मक युग आहे. या काळात अनेकांना नोकरी संबंधित, पगारासंबंधित अनेक समस्या आहेत. अनेकांन तर अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. खरंतर, नोकरी (Job) मिळवण्यात तुमचं शिक्षण आणि तुमची पात्रता या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर नशिबाचीही साथ असावी लागते. त्यामुळेच काहींच्या संधी जवळ असूनही हुकतात.
वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या जागेची ऊर्जा देखील तुमच्या नोकरीवर अप्रत्यक्षपणे प्रभाव करत असते. त्यामुळेच, तुम्हाला अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वास्तूशास्त्र तुमच्या वातावरणातील ऊर्जा सकारात्मक आणि संतुलित करण्यावर भर देतात.
नोकरी मिळवण्यासाठी या वास्तू टिप्स फॉलो करा
1. वास्तूशास्त्रात उत्तर दिशा करिअर आणि व्यवसायिक प्रगतीशी जोडलेली आहे.यासाठी घराच्या उत्तर दिशेला घाण साचू देऊ नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेला ठेवलेल्या अनावश्यक वस्तू काढून टाका. यामुळे या भागातील ऊर्जेचा प्रवाह वाहता राहील आणि तुमच्या नोकरीच्या संधी वाढतील.
2. नोकरीच्या मुलाखतीत आणि लेखी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुमच्या खोलीच्या उत्तर दिशेला हिरवी रोपे लावा. हिरवळ म्हणजे नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. यामुळे चांगल्या संधी तुमच्याकडे आकर्षित करतात. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या टेबलावरही घरातील रोपे लावू शकता. यामुळे तुमचं नशीब खुलू शकते.
3. तुम्ही तुमच्या स्टडी टेबल किंवा डेस्कच्या मागे भिंतीवर पर्वतांचे चित्र लावा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. याशिवाय करिअरच्या यशाची चिन्हे जसे की, प्रमाणपत्रे, पुरस्कार किंवा करिअरशी संबंधित कलाकृती खोलीच्या उत्तर दिशेला ठेवा.
4. गर्दीच्या ठिकाणी नवीन कल्पना सुचत नाहीत. अशा वेळी संवेदनशील कल्पनांचा विचार करण्यासाठी मोकळी जागा शोधा. वास्तू करिअरनुसार, ऑफिस किंवा घरात काचेच्या खिडकीजवळ बसल्याने तुमची सर्जनशीलता वाढते.
5. तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी ज्या खोलीत या वस्तू ठेवल्या आहेत त्या खोलीत चांगला प्रकाश मिळेल याची खात्री करून घ्या. याशिवाय काचेचे टेबल प्रत्येकासाठी शुभ असेलच असे नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: