Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजाच बनवेल तुम्हाला मालामाल? वास्तुशास्त्राचे हे उपाय कराल, तर देवी लक्ष्मी सदैव करेल वास
Vastu Tips: तुम्हाला माहितीय का? तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीचा तुमच्या आर्थिक स्थितीशी खोलवर संबंध आहे. वास्तुनुसार हे उपाय करून पाहा...
Vastu Tips: आज प्रत्येकाला वाटतं, आपल्याकडे धन-संपत्तीची कमी नसावी, सुख-समृद्धी सदैव नांदावी, घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला मालामाल बनवेल. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीचा तुमच्या आर्थिक परिस्थितीशी खूप खोलवर संबंध असतो. वास्तुनुसार मुख्य गेटवर काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार घराच्या दारात काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात धन-समृद्धी येते. जाणून घेऊया कोणते आहेत हे वास्तु उपाय.
वास्तुशास्त्राची मान्यता काय?
वास्तुशास्त्राचा असा विश्वास आहे की, प्रत्येक दिशेमध्ये एक विशेष ऊर्जा असते आणि जर घर किंवा कार्यालय योग्य दिशेने बांधले गेले, किंवा काही उपाय केले, तर त्यातून सकारात्मक ऊर्जा सतत प्रवाहित होते, ज्यामुळे आरोग्य, समृद्धी आणि शांती वाढते. वास्तुशास्त्राने सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते.
मुख्य दरवाजाची चौकट बनवेल धनवान, फक्त हे उपाय करा..
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
मुख्य दरवाजाच्या चौकटीवर हळद आणि कुंकुम तिलक लावल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असे केल्याने दारातून येणारी नकारात्मक ऊर्जाही दूर होते.
घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिक आणि ओम चिन्ह लावल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. लाल सिंदूर किंवा गेरूने बनवणे शुभ मानले जाते.
रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सुख-शांती राहते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो.
दारावर छोटी बेल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मकता पसरते. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी हा एक शुभ उपाय मानला जातो.
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला किंवा दरवाजाजवळच्या कलशात पाणी भरून त्यात आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
या उपायांचे नियमित पालन केल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो असे मानले जाते. वास्तूचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.
जर तुम्हाला जीवनात प्रगती हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीशी संबंधित हे वास्तु उपाय करून पाहू शकता.
हेही वाचा>>>
Vastu Tips: दुसऱ्यांच्या घरातून 'या' 3 वस्तू स्वत:च्या घरी चुकूनही आणू नका, अन्यथा होईल सत्यानाश, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )