Vastu Shastra : घरात पाल दिसणं शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
Astro Tips : आपल्याला आपल्या घरात अनेकदा भिंतीवर वैगरे पाल दिसते. शास्त्रानुसार, घरात एका विशिष्ट जागी पाल दिसल्यास काही संकेत मिळतात. हे शुभ असतात की अशुभ? जाणून घेऊया.
Astro Tips Related To Lizard : घराच्या खिडकीत कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतात, म्हणजे आज घरी पाहुणे येणार आहे. ही झाली कावळ्याची गोष्ट, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरात दिसणारी पाल (Lizard) देखील तुम्हाला भविष्याचे संकेत देत असते. पाल हा शब्द घेतला तरी आपल्याला किळस वाटते आणि खूप जास्त भीती वाटते. पुरुष असो किंवा स्त्री, त्यांची पाल दिसली की ततपप होते. घरात नको नको असणारी पाल तुम्हाला काही संकेत देत असते. घरात पाल दिसणं शुभ की अशुभ? शास्त्र काय सांगते? जाणून घेऊया.
घरामध्ये पाल दिसणं आणि त्याचा परिणाम
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये पाल दिसणं शुभ मानलं जातं, कारण ती धन आणि सुख-समृद्धीची प्रतीक मानली जाते. पण घरातील काही कोपऱ्यांमध्ये दिसणारी पाल अशुभ संकेत देखील देते, याबद्दलच जाणून घेऊया.
घरात काळी पाल दिसणे
जर घरामध्ये काळी पाल दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं, विशेषत: देव्हाऱ्यावर किंवा देव्हाऱ्याजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं. याचा अर्थ घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं किंवा इतर काही अडचणी येऊ शकतात. पाल ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते, परंतु काळी पाल लक्ष्मीशी संबंधित नाही म्हणून, देव्हाऱ्याजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं.
घराच्या मुख्य दारावर पाल दिसणे
जर कधी पाल मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करताना दिसली तर ते शुभ चिन्ह मानलं जातं. अशा वेळी घरावर लवकरच पैशांचा पाऊस पडेल, असं मानलं जातं.
घरात दोन पाली एकत्र दिसणे
दोन पाली एकत्र दिसणं सामान्य आहे आणि त्याचा काही विशेष शुभ किंवा अशुभ अर्थ नाही. पण दोन पाली आपापसात भांडत असतील तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. कधी कधी घरात आजारपण येऊ शकतं, कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडू शकते.
पाल पडताना दिसणे
वारंवार पाल पडत असल्यास ते शुभ मानलं जात नाही, याशिवाय, पाल जमिनीवर पडणं हे अनेक शुभ आणि अशुभ संकेत देतं. पण अशा पालीला मारण्याची चूक अजिबात करू नका, कारण असं करणं तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: