Mauni Amavasya 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर मौनी अमावस्येला बनतोय दुर्मिळ त्रिवेणी योग; 3 राशींचं नशीब चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Mauni Amavasya 2025 Triveni Yog : मौनी अमावस्येला, म्हणजेच 29 जानेवारीला अत्यंत शुभ असा त्रिवेणी योग जुळून आला आहे, ज्यामुळे 3 राशींचं भाग्य उजळू शकतं. या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.
Mauni Amavasya 2025 Triveni Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनंतर संक्रमण करतात आणि कधी कधी इतर ग्रहांच्या संपर्कात येऊन अनेक शुभ-अशुभ योग तयार करतात. या वेळी देखील मौनी अमावास्येला अतिशय शुभ योग तयार होणार आहे. यावेळी मौनी अमावस्येला त्रिवेणी योग (Triveni Yog) तयार होत आहे. या काळात मकर राशीत सूर्य, चंद्र, बुध एकत्र येतील, ज्यामुळे त्रिग्रही आणि त्रिवेणी योग तयार होईल. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. तसेच, या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
त्रिवेणी योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीतून नवव्या घरात तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच . तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळणार आहेत. नोकरदार लोकांसाठी काळ चांगला राहील. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठं यश मिळू शकतं. त्याच वेळी, आपण नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात प्रवास करू शकता. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिवेणी योगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरावरच होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होईल. तसेच यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी खूप प्रगती होऊ शकते. यशाच्या नवीन संधी मिळतील, जे तुमच्यासाठी फलदायी ठरेल. लोकांमध्ये तुमची एक खास ओळख निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल देखील दिसतील. व्यावसायिकांनाही या काळात मोठा फायदा होईल. तुमचं वैवाहिक जीवन छान असेल.
तूळ रास (Libra)
त्रिवेणी योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतं. तसेच, यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. अनेक सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या आईशी तुमचं नातं घट्ट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: