Vaikuntha Ekadashi : 2025 वर्षातील शेवटची वैकुंठ एकादशी या राशींसाठी ठरणार लकी; सरत्या वर्षात मिळणार धनलाभाचे संकेत
Vaikuntha Ekadashi 2025 : वैकुंठ एकादशीला पुत्रदा एकादशीच्या नावाने देखील ओळखलं जातं. तसेच, या दिवशी पूजा, व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.

Vaikuntha Ekadashi 2025 : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, वैकुंठ एकादशी ही भगवान विष्णू (Lord Vishnu) यांना समर्पित आहे. ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. ही शुभ तिथी 30 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. वैकुंठ एकादशीला पुत्रदा एकादशीच्या नावाने देखील ओळखलं जातं. तसेच, या दिवशी पूजा, व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. त्यानुसार, 2025 वर्षातली शेवटची वैकुंठ एकादशी कोणकोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी फार महत्त्वाची मानली जाणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ फार चांगला ठरणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी चांगली ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या करिअरसाठी हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे दार खुले होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी वैकुंठ एकादशी फार खास मानली जाणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभकारक ठरणार आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ फार योग्य असेल. घरातील वातावरण सुखकारक असेल. तसेच, या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी वैकुंठ एकादशी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा चांगला विकास झालेला दिसेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















