Trigrahi Yog 2024 : मेष राशीत बनतोय त्रिग्रही योग; कर्कसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ
Trigrahi Yog 2024 : पंचांगानुसार 25 एप्रिल रोजी काही राशींच्या लोकांना ग्रहांच्या विशेष संयोगामुळे चांगला लाभ मिळू शकतो. या राशींचं नशीब एका फटक्यात पालटू शकतं, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Trigrahi Yog 2024 : मेष राशीमध्ये प्रमुख ग्रहांची चलबिचल राहणार आहे. ग्रहांच्या हालचाली पाहता गुरुवार, 25 एप्रिल 2024 हा एक खास दिवस आहे. या दिवशी शुक्र (Venus) मेष राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार होईल. गुरू (Jupiter) गेल्या एक वर्षापासून मेष राशीत आहे. सूर्याने (Sun) देखील 13 एप्रिलला मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या 3 ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग (Trigrahi Yog 2024) निर्माण झाला आहे. या योगाचा 4 राशींना विशेष फायदा होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
त्रिग्रही योग तयार झाल्याने मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे . हा आठवडा तुमच्यासाठी अगदी फायद्याचा ठरणार आहे. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाटेल. तुम्हाला तुमच्या कामात आराम मिळेल. तुमच्या जीवनातील अडचणी संपतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. या काळात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता आणि तुमच्या प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.
कर्क रास (Cancer)
त्रिग्रही योग तयार झाल्याने कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही मीडिया किंवा चित्रपटांशी निगडीत असाल तर तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होतील.
तूळ रास (Libra)
त्रिग्रही योग तयार झाल्याने शिक्षण, करिअर, संपत्ती, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनासाठी उत्तम काळ आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे, ते प्रगतीच्या मार्गावर पुढे जातील. प्रेम संबंध चांगले राहतील.
धनु रास (Sagittarius)
त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे हा काळ धनु राशीच्या लोकांसाठीही फलदायी राहील. या काळात तुम्ही स्वतःसाठी चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. वाहन, घर खरेदी करू शकता. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचाही विचार करू शकता. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमसंबंधातही तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक सदस्य तुमच्या नात्याला मान्यता देऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :