Taurus Horoscope Today 28 May 2023 : आज धार्मिक स्थळाला भेट देण्याचा चांगला योग; वाचा तुमचं राशीभविष्य
Taurus Horoscope Today 28 May 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक कामांमध्ये फायदेशीर राहील.
Taurus Horoscope Today 28 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मीडिया आणि बँकिंग क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच काळापासून तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज ते तुमच्यासाठी यशस्वी होईल. तब्येतीत चढ-उतार असतील. बाहेरचे अन्न खाणेही टाळावे लागेल. तुम्ही तुमच्या नोकरीत बदलासाठी विचार करू शकता. वरिष्ठ सदस्याचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्व लोकांची मनं जिंकू शकता. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील.
करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक कामांमध्ये फायदेशीर राहील. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि तुमचे काम सुरळीत चालेल. जास्त धावल्यामुळे थकवा जाणवेल, पण यश मिळाल्याने फारसा त्रास होणार नाही. व्यावसायिकांसाठी अधिक लाभाचा दिवस आहे. रविवार असल्याने त्यांचे काम व्यवस्थित पार पडेल. नोकरी व्यवसायातील नोकरदारांवर वेळेवर काम पूर्ण करण्याचा दबाव राहील.
वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बंधने आल्यासारखे वाटेल. यामुळे तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही.
वृषभ राशीचे आजचे आरोग्य
शिरा ताणणे, डोकं दुखणे इत्यादी समस्या असू शकतात आणि त्यामुळे तुमच्या वेदना वाढू शकतात. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
नारायण कवच पाठ करणे लाभदायक ठरेल. गायीला चारा खायला द्या आणि आशीर्वाद घ्या.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :