(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taurus Horoscope Today 21 April 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांना नकळत पैशांचा लाभ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य
Taurus Horoscope Today 21 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असेल.
Taurus Horoscope Today 21 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नकळत पैशांचा लाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. तुम्हाला काही अधिकार दिले जातील. विवाहित लोक आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी दिसतील. जोडीदाराशी किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुमच्या नात्यात इतर कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. बदलत्या हवामानामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. राजकारणात तुमची लोकप्रियता वाढेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
कामावर लक्ष केंद्रित करा
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असेल. आज काही बाबींमध्ये अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. इतर ठिकाणी लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. कोणाचा तरी सल्ला ऐका, पण अंमलात आणण्यापूर्वी नीट विचार करा. आज तुम्हाला कोणत्याही प्रॉपर्टी डीलमध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो.
वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन
आजचा दिवस कौटुंबिक बाबतीत चांगला जाईल. कुटुंबातील जोडीदार आणि जवळच्या नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. प्रेम जीवनाच्या दृष्टीनेही आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे प्रेम जीवन खूप रोमँटिक असेल. आज संध्याकाळी तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी जाऊ शकता.
वृषभ राशीसाठी आजचे आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने तुमचा दिवस सामान्य असेल. पण खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
वृषभ राशीसाठी आज उपाय
विष्णु सहस्त्रनाम पाठ करा. तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :