एक्स्प्लोर

Swami Samartha : आज गुरुवारी एकदा वाचा स्वामींचे 'हे' मंत्र; आयुष्यात घडतील सकारात्मक बदल, सर्व संकटं दूर होऊन शुभवार्ता पडतील कानी

Swami Samartha Mantra : स्वामी समर्थांचा हा मंत्र एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ “तारणारा” असा होतो. दर गुरुवारी केवळ 10 मिनिटं या मंत्राचं वाचन केलं किंवा हा मंत्र ऐकला तरी व्यक्तीची सर्व संकटं दूर होऊ शकतात.

Swami Samartha Tarak Mantra : स्वामी समर्थांचा तारक मंत्र (Swami Samartha Tarak Mantra)  हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे.  'तारक' म्हणजे 'तारून नेणारा'. हा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने, तुम्हाला सर्व संकटातून वाचवणारा मंत्र आहे. म्हणूनच त्याला तारक मंत्र म्हणतात. हा मंत्र म्हणल्याने किंवा ऐकल्याने मनातील सर्व चिंता, वेदना आणि दु:ख दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो.

स्वामींच्या (Swami) तारक मंत्राच्या शक्तिचं अनुभव घेतलेल्या भक्तांनी या मंत्राचं वर्णन प्रत्येक गोष्टीवर उपचार असं केलं आहे. तसेच हा मंत्र  आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता देखील घेऊन येतो. एखादी माणूस नैराश्येत असेल किंवा दु:खी असेल तर त्याचं जगणं चांगलं करण्याची ताकद तारक मंत्रात आहे.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र (Shri Swami Samartha Tarak Mantra) 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,

परलोकी ही ना भीती तयाला

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,

वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।

जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,

कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।

आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,

नको डगमगु स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,

स्वामीच या पंचामृतात।

हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,

ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Bhushan Kadu : उद्या स्वामींच्या मठात या... जीवन संपवायला निघालेल्या भूषण कडूच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला?

                                                                            

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget