Surya-Shani Yuti 2025 : काही दिवसांतच होणार शनी-सूर्याचं होणार महासंक्रमण; 'या' 3 राशींचं रातोरात पालटणार नशीब
Surya-Shani Yuti 2025 : सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. तर, सूर्य सध्या मकर राशीत आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी रात्री 10 वाजून 03 मिनिटांनी सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Surya-Shani Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचं संक्रमण एका ठराविक काळाने होतं. प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य-शनी (Shani Dev) एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. यांच्यामध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. त्याचप्रमाणे कुंडलीतील या दोन ग्रहांबरोबरच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
सध्या शनी आपली स्वरास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. तर, सूर्य सध्या मकर राशीत आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी रात्री 10 वाजून 03 मिनिटांनी सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना या महासंक्रमणाचा चांगलाच लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते पाहूयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनी-सूर्याची युती फार खास असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. या काळात तुम्ही शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करणं शुभ ठरेल. तर, रविवारच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना सूर्य-शनीच्या परिवर्तनाचा चांगला लाभ होणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तर, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा देखील मोठा विस्तार झालेला दिसेल. यासाठी शनिवारच्या दिवशी काळ्या श्वानाला चपाती द्या. तर, सूर्यदेवाला जल अर्पण करा. तसेच, 'ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः' या मंत्राचा जप करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना सूर्य-शनीच्या परिवर्तनाचा चांगला लाभ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तरुणांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र धारण करु शकता. तसेच, पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: