Surya Ketu Yuti 2025 : ऑगस्ट महिन्यात 3 राशींचं भाग्य उजळणार, सूर्य-केतूच्या युतीने करिअरला लागणार यू-टर्न; नशिबाची लॉटरी
Surya Ketu Yuti 2025 : सूर्य आणि केतूच्या युतीचा मेष ते मीन राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, या युतीचा शुभ परिणाम नेमका कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Surya Ketu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्टचा महिना ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार, काहीसा खास असणार आहे. या दरम्यान सूर्य ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत संक्रमण करुन केतू (Ketu) ग्रहाबरोबर युती करणार आहे. 17 ऑगस्ट रोजी सूर्य (Sun) सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच केतू ग्रह विराजमान आहे. सूर्य आणि केतूच्या युतीचा मेष ते मीन राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, या युतीचा शुभ परिणाम नेमका कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्य-केतू ग्रहाची युती मेष राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील. जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
सूर्य-केतू ग्रहाच्या युतीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, मुलांच्या उच्च शिक्षणाला चांगला वाव मिळेल. तुमचं संवादकौशल्य चांगलं दिसून येईल. तसेच, या काळात व्यवसायिकांच्या हातात एखादी चांगली मोठी डील लागू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नवीन गोष्टींचा स्वीकार कराल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी सूर्य-केतू ग्रहाची युती फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. समाजात देखील तुम्हाला चांगली मान-प्रतिष्ठा मिळेल. तसेच, ज्या अनेक दिवसांपासून तुमच्या आर्थिक समस्या होत्या त्या या काळात संपतील. त्यामुळे तुमच्यावर कोणताच मानसिक तणाव राहणार नाही. नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















