August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य
August 2025 Monthly Horoscope : ऑगस्टचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

August 2025 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिना (August) लवकरच सुरु होणार आहे. ऑगस्ट महिन्यात ग्रहांची स्थिती तशी शुभ मानली जातेय. सध्या श्रावण (Shravan) महिना सुरु आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात सूर्य, शुक्र आणि बुध ग्रहासह चार मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ऑगस्टचा महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries August 2025 Monthly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना काहीसा सामान्य असणार आहे. या काळात तुम्ही अनेक गोष्टींसाठी प्रयत्न कराल. पण, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेलच असं नाही. तसेच, मेहनत घेण्याची तयारी या महिन्यात ठेवा. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा काहीसा वेळ फार व्यस्त जाणार आहे. मात्र, या दरम्यान तुमच्यासाठी अनेक आव्हानं येतील. त्याला पेलण्याची तयारी ठेवा.
वृषभ रास (Taurus August 2025 Monthly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळणार आहे. मित्रांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कर्माचं चांगलं फळ मिळेल. तुमच्यावर कोणाचाही दबाव राहणार नाही. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता.
मिथुन रास (Gemini August 2025 Monthly Horoscope)
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना फार सकारात्मक दृष्टीकोनाचा असणार आहे. या काळात तुमच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टींचे संकेत तुम्हाला मिळतील. महिन्याची सुरुवात तुमच्यासठी फार उमेदीची असणार आहे. मात्र, महिन्याच्या शेवटी तुमच्या करिअरला वेगळी दिशा मिळेल. या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्यास सज्ज व्हा. तसेच, स्वत:मधील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करा.
कर्क रास (Cancer August 2025 Monthly Horoscope)
कर्क राशीसाठी ऑगस्टचा महिला काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच, दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवेल. त्यामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल. कामात मन रमणर नाही. तसेच, बिझनेसच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हळुहळू सावधानता बाळगा. मोठे निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
सिंह रास (Leo August 2025 Monthly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना काहीसा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात कोणताही शॉर्टकटचा पर्याय निवडू नका. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन गोष्टींचा स्वीकार करा. स्वत:तील कलागुणांना चांगला वाव देण्याचा प्रयत्न करा. तसेच, महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीला नक्की यश मिळेल.
कन्या रास (Virgo August 2025 Monthly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच, तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. महिन्याच्या शेवटी आपल्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्या कारणाने बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळा. गरम पाणी प्या. तसेच, नियमित योग आणि व्यायाम करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :

















