Surya Grahan 2025 : दुर्मिळ योग! तब्बल 100 वर्षांनंतर शनी संक्रमण आणि सूर्य ग्रहणाचा संयोग; 'या'3 राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'
Surya Grahan and Shani Gochar : नवीन वर्षात एकाच दिवशी शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहण होणार आहे. यामुळे दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. तर, या संयोगाने काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील.
Surya Grahan and Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2025 मध्ये अनेक दुर्मिळ आणि शुभ योग (Yog) जुळून येणार आहेत. याचा प्रभाव व्यक्तींवर तर होणारच आहे. मात्र, देश-विदेशातही याचे पडसाद पाहायला मिळतील. 2025 च्या मार्च महिन्यात शनी (Shani Dev) कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, याच दिवशी आंशिक सूर्य ग्रहण (Surya Grahan) लागणार आहे.
याचाच अर्थ, एकाच दिवशी शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहण होणार आहे. यामुळे दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. तर, या संयोगाने काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच, अचानक लाभही मिळू शकतो. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहण लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तुमचे अनेक ठिकाणी रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही परदेशात यात्रा करु शकता. तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीचं संक्रमण आणि सूर्याचं ग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरमार आहे. या काळात जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर तुम्ही करु शकता. तुमच्या कार्यक्षेत्राचा मोठा विस्तार होईल. व्यवसायात प्रचंड लाभ मिळेल. पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं लाभदायी ठरेल. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी ठरतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनी आणि सूर्य ग्रहणाचा दुर्लभ संयोग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, व्यवसायाचा चांगला विस्तार होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: