Shani Gochar 2025 : नव्या वर्षात 'या' एका राशीला शनी प्रचंड त्रास देणार; साडेसातीचा असणार तिप्पट प्रभाव
Shani Gochar 2025 : ग्रहांचा न्यायाधीश शनी 29 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता मीन राशीत संक्रमण करणार आहे. या राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत स्थित असणार आहे.
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या (Shani Dev) साडेसातीचा काळ हा सर्वात कठीण काळ मानला जातो. शनी (Lord Shani) जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यानुसार, नवीन वर्षात 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे.
ग्रहांचा न्यायाधीश शनी 29 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता मीन राशीत संक्रमण करणार आहे. या राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत स्थित असणार आहे. त्यानंतर 3 जून 2027 रोजी शनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव कसा असेल ते जाणून घेऊयात.
मेष राशीत शनीची साडेसाती कधी सुरु होईल?
शनी मीन राशीत 29 मार्च 2025 रोजी प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या लोकांच्या जीवनात साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होईल. तर, मनी राशीवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा असेल. तर, कुंभ राशीत तिसरा टप्पा असेल.
मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव
ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 पासून मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होईल. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात संकटांचा सामना करावा लागेल. कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. तसेच, आरोग्याच्या संदर्भात अनेक तक्रारी उद्भवू शकतात. आर्थिक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळे कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होईल.
मेष राशीची साडेसाती कधी संपणार?
मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 31 मे 2032 पर्यंत असणार आहे. त्यानंतर शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपेल.
'या' राशींना मिळणार साडेसातीपासून मुक्ती
सध्या मकर राशी शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यात आहे. ही साडेसाती 2025 मध्ये संपणार आहे. त्यामुळे, 29 मार्च 2025 नंतर मकर राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव नसणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: