Surya Grahan 2025: आज 2025 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण! भारतात दिसणार का? सुतक काळ कधी असेल? किती वाजता दिसेल? सर्व माहिती एका क्लिकवर...
Surya Grahan 2025: वैदिक दिनदर्शिकेनुसार, आज 2025 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ते किती वाजता होईल? भारतात दिसेल का? त्याचा सुतक काळ किती असेल? जाणून घ्या..

Surya Grahan 2025: ज्योतिषशास्त्रात, सूर्याला आत्मा, यश आणि चैतन्य यांचे प्रतीक मानले जाते. अशात आज 2025 मधील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, मात्र हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात त्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखला जातो. सूर्यग्रहणाचा अध्यात्मावर आणि दैनंदिन जीवनावर अनेकदा परिणाम होतो. आजचे सूर्यग्रहण किती वाजता होईल? भारतात ते दिसेल का? त्याचा सुतक काळ किती असेल? जाणून घ्या सर्वकाही..
2025 वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण
वैदिक दिनदर्शिकेनुसार, आज 21 सप्टेंबरच्या रात्री सूर्यग्रहण होणार आहे. 2025 मधील हे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आहे, जे केवळ खगोलशास्त्रीय जगातच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचे आहे. भारतात सूर्यग्रहण किती वाजता सुरू होईल? कधी संपेल ते जाणून घ्या.
सूर्यग्रहण किती वाजता होईल?
पंचांगानुसार, सूर्यग्रहणाची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:59 ते 22 सप्टेंबर पहाटे 3:23 पर्यंत आहे. 21 आणि 22 सप्टेंबरच्या रात्री 1:11 वाजता सूर्यग्रहणाचा पीक टाईम (सर्वाधिक प्रभावशाली) असेल.
भारतात सूर्यग्रहण दिसेल की नाही?
ज्योतिषींच्या मते, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. दुसऱ्या शब्दांत, या वर्षीच्या चार ग्रहणांपैकी 7 सप्टेंबर रोजी झालेले चंद्रग्रहण हे एकमेव होते, जे भारतात दिसले. इतर तीन ग्रहणे भारतात दिसली नाहीत.
सूर्यग्रहणाचा सुतक काळ वैध असेल का?
ज्योतिषींच्या मते, भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याने, सुतक काळ देखील दिसणार नाही. जर भारतात सूर्यग्रहण दिसले असते, तर त्याचा सुतक काळ ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होईल. याचा अर्थ सूर्यग्रहणासाठी सुतक काळ सकाळी 11 वाजता सुरू होईल.
आंशिक सूर्यग्रहण कसे होते?
यंदा होणारे सूर्यग्रहण हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे, तसेच हे आंशिक सूर्यग्रहण असेल. चंद्र सूर्यासमोर येतो पण त्याला पूर्णपणे झाकत नाही तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्याचा फक्त एक भाग सावलीत राहतो आणि उर्वरित भाग दिसतो.
हेही वाचा :
Surya Grahan 2025: आज अमावस्येसह सूर्यग्रहणाचा अद्भूत संगम! सूर्य-शनिची महायुती 'या' 5 राशींचं सौभाग्य मिळवून देईल, बॅंक बॅलेन्स, संपत्ती वाढणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















