एक्स्प्लोर

Surya Grahan 2024: सोमवती अमावस्येला वर्षातील पहिले महाग्रहण, चुकूनही करु नका 'या' गोष्टी,अन्यथा आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

Surya Grahan 2024:  ग्रहणाच्या वेळी राहुचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे आपल्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी प्रभावित होतात. यासाठी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य आहे. जाणून घ्या सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये.

Surya Grahan 2024:  ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला (Eclipse) फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. 54 वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे.  त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.  पंचांगानुसार 2024 मध्ये 8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहण अशुभ मानले जाते. सूर्यग्रहण म्हटलं की, या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. कारण ग्रहणाच्या वेळी राहुचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे आपल्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी प्रभावित होतात. यासाठी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य आहे. जाणून घ्या सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये.

ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotish Shastra) सूर्यग्रहण काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सूर्यग्रहणामध्ये काही कामं   करु नये असे सांगितले जाते. चुकून जर तुम्ही ती कामं केली जर तुमचे नुकसान होऊ शकते. अशावेळी सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती कामं करणे टाळावीत हे आज आपण जाणून घेणार आहोत…

ग्रहण काळात अन्न सेवन करु  नये 

 धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्र ग्रहणाच्या वेळी अन्न का खाऊ नये. पुराणात असे मानले जाते की ग्रहण काळात अन्न खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात. सूर्यग्रहणाच्या सुतक काळात तुळशीच्या बिया धान्यात घालाव्यात.

 झाडांना हात लावू नका 

 तुळशी, पिंपळाची झाडे पवित्र मानली जातात. सूर्यग्रहणाच्या काळात तुळशीची पाने तोडू नये. माता लक्ष्मी तुळशीमध्ये तर भगवान विष्णू पिंपळात वास करतात. सूर्यग्रहण काळात या झाडांना हात लावू नये. यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते.

देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नका 

 सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका किंवा त्यांची पूजा करू नका. यामुळे दोष निर्माण होतो. यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात. दिवसभर पुजा पाठ करा, यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतील.

गर्भवती महिलांनी खबरदारी घ्या 

सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. खबरदारी घ्या. सुतकच्या सुरुवातीपासून ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. सुया, कात्री, चाकू इत्यादी धारदार वस्तू कोणत्याही कामासाठी वापरू नयेत.

खरेदी करण्यास मनाई 

 हिंदू मान्यतेनुसार सुतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदुषीत होते. सुतकातील अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी. शास्त्रानुसार ग्रहण आणि सुतक काळात कोणतेही शुभ कार्य, पुजा किंवा खरेदी करू नये. कुंडलीत शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो.

नवीन काम सुरू करू नका 

सूर्यग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. तसेच ग्रहणकाळात नखे कापणे आणि केस विंचरु नका.

सूर्यग्रहण काळात काय करावे 

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करा. ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करून दान करावे. देवालाही गंगाजलाने स्नान घालावे. याच्या शेवटी गंगाजल शिंपडून संपूर्ण घर पवित्र करा. ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करा.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Surya Grahan 2024: तब्बल 54 वर्षांनंतर 8 एप्रिलला लागणारे सर्वात मोठे सूर्यग्रहण अतिशय प्रभावशाली, 'या' चार राशी होतील करोडपती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget