एक्स्प्लोर

Surya Gochar 2024 : शनी - सूर्याच्या मार्गीने आला अशुभ योग; मेषसह 'या' 5 राशींसाठी ठरणार सर्वात घातक, पदोपदी मिळतील संकेत

Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. यामुळे यांच्या एकत्र मार्गी होण्याने अशुभ योग आला आहे.

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतीच शनीने मार्गी चाल केली त्यानंतर आज सूर्याने (Sun) देखील संक्रमण करत वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. या संक्रमणाबरोबरच शनीची (Shani Dev) वक्री दृष्टी सूर्यावर असणार आहे. यामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरु शकतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरपासून ते अगदी तुमच्या कौटुंबिक जीवनापर्यंत संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. यामुळे यांच्या एकत्र मार्गी होण्याने अशुभ योग आला आहे. आता याचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होतो ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांवर शनीची तिसरी दृष्टी असणार आहे. या दरम्यान तुमचे कुटुंबियांबरोबर संबंध बिघडू शकतात. तसेच, वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होईल. तुम्ही जर वाहन चालवत असाल तर जरा जपून चालवा. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात कोणतीच गुंतवणूक करु नका. थोडा काळ जाऊ द्या. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य सप्तम चरणात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, जे विवाहित लोक आहेत त्यांना या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. तुमच्या नात्यात चढ-उतार होऊ शकतात. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आवश्यक तो लाभ मिळणार नाही. नोकरदार वर्गातील लोकांना देखील कामाच्या ठिकाणी अनेक समस्या भेडसावतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सूर्याचं संक्रमण शनी आपली सप्तम दृष्टी सिंह राशीच्या लोकांवर पडणार आहे. या काळात तुमच्या घरात अनेक वाद निर्माण होतील. पण, तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. या काळात अहंकार सोडून द्या. अन्यथा अहंकार तुमच्यावर जोर करेल आणि नंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना या काळात फारसा लाभ मिळणार नाही. तसेच, जर तुमच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरु असतील तर त्यापासून थोडं सावध राहा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्याचं संक्रमण होऊन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी दहाव्या दृष्टीत असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. तसेच, जर तुमच्या नोकरीत ताणतणाव सुरु असतील तर वेळीच जॉब स्विच करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे थोडं धैर्य आणि समजुतदारीने निर्णय घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला जमिनी संबंधित वादविवादाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, महिन्याच्या शेवटी तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. यासाठी वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:     

Shani Margi 2024 : शनीची मार्गी चाल सुरु! पुढचे 134 दिवस 'या' 3 राशींना पिडणार शनी; एकामागोमाग येतील संकटं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Embed widget