Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्या! लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा सुख-समृद्धीचे 'हे' उपाय
Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. जाणून घ्या
Somvati Amavasya 2023 : यंदा सोमवती अमावस्या 12 नोव्हेंबरला आहे आणि गोवर्धन पूजाही याच दिवशी आहे. सोमवती अमावस्येला पूजा, दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्येबाबत अशी धारणा आहे की, या दिवशी धन वाढवण्याचे उपाय केल्याने सुख-समृद्धी देखील वाढते आणि लक्ष्मी प्रसन्न होते.
सोमवती अमावस्येला धनवृद्धीसाठी उपाय करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. सोमवती अमावस्येला सौभाग्य आणि समृद्धीसाठी केले जात असलेले काही उपाय जाणून घेऊया.
शिवलिंगाचा अभिषेक
सोमवती अमावस्येला शिवलिंगाचा जलाभिषेक कच्चे दूध आणि दह्याने करावा. असं केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात. तुमची सर्व वाईट कामं दूर होतात आणि तुमच्या घरातील गरिबी दूर होते. शंकराची देखील घरावर कृपा होते.
मिठाचा उपाय
सोमवती अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने पुसल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक नकारात्मकता दूर होईल. फरशी पुसण्यासाठी खडा मीठ वापरा. या उपायाने तुमच्या घरावरील एखाद्याच्या वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो.
श्रीगणेशाची करा पूजा
सोमवती अमावस्येच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय आहेत. या दिवशी गणपतीला सुपारी अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो आणि तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमच्या घरातील सुख-समृद्धी वाढते.
ईशान्य कोपर्यात दिवा लावावा
सोमवती अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपर्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने तुमचं सौभाग्य वाढतं आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरातील समृद्धी वाढवते आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही.
तुळशीचे उपाय
सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. तुळशीभोवती प्रदक्षिणा केल्याने तुमच्या घरातील गरिबी दूर होते. या दिवशी तुळशीखाली तुपाचा दिवा लावल्याने पुण्य प्राप्त होतं. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णू प्रसन्न होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kartik Month 2023: कार्तिक महिन्यात 'या' वेळी तोडू नये तुळशीची पानं; ओढावेल आर्थिक संकट