Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रहाचं होतंय संक्रमण! अवघ्या काही दिवसांतच 6 राशींचा गोल्डन टाईम सुरु; नशिबाचे फासे पलटायला अवघे 7 दिवस बाकी
Shukra Gochar 2025 : धनु राशीत शुक्र, गुरु ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना चांगले लाभ मिळतील. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Shukra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 7 वाजून 50 मिनिटांनी धनसंपत्ती आणि सुख-समृद्धीचा कारक शुक्र ग्रह (Shukra Gochar) वृश्चिक राशीतून धनु राशीत संक्रमण करणार आहे. धनु राशीत शुक्र, गुरु ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना चांगले लाभ मिळतील. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांच्या नवव्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभेल. तसेच, परदेशात नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध होतील. या काळात तुम्ही हातात घेतलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. मित्रांचा सहवास देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुमच्या नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या आठव्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. तुमचे रखडलेले पैसे या काळात तुम्हाला मिळतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. लॉटरी मिळण्याचे संकेत आहेत. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने लवकरच तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या सहाव्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. या काळात शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे आजार आणि कर्जातून मुक्ती मिळेल. जर तुम्ही दिर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुमचं आजारपण दूर होईल. हळुहळू तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या तिसऱ्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या साहस, पराक्रमात वाढ होईल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला या काळात शिकता येतील. हाती घेतलेल्या कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी हा काळ योग्य आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या दुसऱ्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. कामात तुमच्या चांगली प्रगती होईल. तसेच, समाजात मान-सन्मान देखील मिळण्याची शक्यता आहे. बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या दहाव्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तसेच, एखादं नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.तसेच, तुमच्या व्यवसायात नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















