![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shukra Gochar 2024 : 31 जुलैपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; नोकरी-व्यवसाय गाठणार नवी उंची, बँक बॅलन्स वाढणार
Venus Transit 2024 : सुख आणि समृद्धी देणारा ग्रह शुक्र लवकरच सिंह राशीत प्रवेश करणार आहे, याचा तीन राशींना सर्वाधिक लाभ मिळू शकतो.
![Shukra Gochar 2024 : 31 जुलैपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; नोकरी-व्यवसाय गाठणार नवी उंची, बँक बॅलन्स वाढणार Shukra Gochar 2024 Venus Transit will be lucky for these zodiac signs wealth get strong with lot of money Shukra Gochar 2024 : 31 जुलैपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; नोकरी-व्यवसाय गाठणार नवी उंची, बँक बॅलन्स वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/27/e9ea7fa07e85f8e5a177e700d5fad8321722074915340499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Venus Transit 2024 : ज्योतिषशास्त्रात शुक्राला (Venus) विशेष महत्त्व आहे. शुक्र हा धन-संपत्ती, सुख-समृद्धी, आकर्षण आणि प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्र सुमारे 26 दिवसांत राशी बदलतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी शुक्र कर्क राशीमध्ये स्थित आहे. जुलैच्या शेवटी, म्हणजेच 31 तारखेला शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांना शुक्राच्या मार्गक्रमणाचा अनेक पटींनी लाभ मिळू शकतो. शुक्राने सिंह राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र 31 जुलै रोजी दुपारी 2:15 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल, यानंतर काही राशींचं नशीब उजळेल. शुक्र या राशीत (Zodiac Signs) प्रवेश करत असल्याने काही राशीच्या लोकांच्या स्वभावातही बदल दिसू शकतात, ते कसे? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
या राशीच्या लोकांना जीवनात आनंद मिळणार आहे. करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसेल. यासह, तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मान मिळू शकेल. कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, याचा फायदा तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांसोबत सुरू असलेले गैरसमजही दूर होतील. तुमचं लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. तुमचं वैवाहिक जीवनही चांगलं राहील. जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. शेअर मार्केटमधूनही तुम्ही नफा कमवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, याच्या मदतीने तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्यही चांगलं राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीची चांगली कमाई होण्याची चिन्हं आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. यासोबतच पदोन्नतीसह प्रमोशन मिळू शकतं. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकता. नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
सिंह रास (Leo)
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्ही कामाच्या संदर्भात अनेक सहली करू शकता, यातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धा देताना देखील दिसाल, यामुळे तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही जास्त पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जोडीदारासोबत गोडवा दिसेल. मुलांकडून आनंद मिळू शकेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)