Shukra Gochar 2024 : अवघ्या 24 तासांनंतर 'या' राशींच्या जीवनात घडतील मोठे बदल; पुढचे 25 दिवस जगतील राजासारखं आयुष्य
Shukra Gochar 2024 : हिंदू शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 12 जून रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे.
Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रहाचं आपलं असं एक महत्त्व आहे. शुक्र ग्रहाला धन-वैभवाचा कारक म्हणतात. 12 जून रोजी शुक्र वृषभ राशीतून मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या दरम्यान शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळणार आहे.
हिंदू शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 12 जून रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. तर, 7 जुलैपर्यंत तो या राशीत विराजमान असणार आहे. या दरम्यान शुक्र ग्रहाच्या मिथुन राशीत परिवर्तनाने अनेक राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. अशातच अनेक राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. या दरम्यान कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचं संक्रमण लाभदायक ठरणार आहे. शुक्र ग्रह मेष राशीच्या तिसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशींचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधातही चांगले दिवस सुरु राहतील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
12 जून रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरणार आहे. मिथुन राशीच्या दहाव्या चरणात शुक्र ग्रहाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय यांसारख्या बाबतीत चांगला लाभ मिळणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील. तसेच, या काळात तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या सहाव्या आणि अकराव्या चरणाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर तो सातव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना धनसंपत्ती प्राप्त होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तसेच, व्यवहारात देखील चांगला नफा मिलेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: