Shravan 2022 : 'या' राशीच्या मुलींसाठी श्रावण महिना ठरणार खास, करा 'हा' उपाय, मिळेल लाभ!
Shravan 2022 : या महिन्यात जे भाविक भोलेनाथ आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कृपा राहते, अशी मान्यता आहे.

Shravan 2022 : श्रावण महिना (Shravan 2022) भगवान शिव (lord Shiva) आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या महिन्यात जे भाविक भोलेनाथ आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कृपा राहते, अशी मान्यता आहे. यावेळी काही राशींसाठीही श्रावण महिना खास असणार आहे. या राशीच्या मुलींवर भगवान भोलेनाथांची कृपा होणार आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
या ठिकाणी श्रावण महिन्याला प्रारंभ, महाराष्ट्रात कधीपासून?
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे गुरूपौर्णिमेपासून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि बिहार येथे श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे परंतू महाराष्ट्रात म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण भारतात शुक्रवार 29 जुलै 2022 पासून श्रावण मासारंभ होत आहे. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे.
वृषभ - श्रावण महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्या मुलींच्या लग्नाला उशीर होत आहे. योग्य वर मिळण्यात अडचण असेल तर या महिन्यात त्यावर मात करता येईल. सोमवारी भगवान भोलेनाथाला अभिषेक करा, लाभ मिळेल.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरेल. मात्र, तुमच्या राशीवर शनीची ढैय्या सुरू झाली आहे. शंकराची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. म्हणूनच श्रावण महिना तुमच्यासाठी खास आहे. श्रावणात दर शनिवारी आणि सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि दानधर्म करा.
कन्या - श्रावणमध्ये केलेले उपाय आणि पूजेने तुम्हाला आराम मिळेल. ज्या मुलींची राशी कन्या आहे त्यांना फायदा होणार आहे. लग्न निश्चित होऊ शकते. करिअर आणि आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर त्यातही फायदा होईल. श्रावणी सोमवार या दिवशी भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा. अभिषेक विधीपूर्वक करावा. उपवास करताना नियमांचे पालन करा, विशेष लाभ मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
